आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 'Putin Made A Big Mistake, Now Russia Will Become China's Tail': Dr. Ulrich Breikner, A Professor At Stanford University In Berlin | Marathi News

भास्कर इंटरव्ह्यू:‘पुतीन यांनी मोठी चूक केली, आता रशिया बनेल चीनचे शेपूट’ : डॉ. उलरिख ब्रइक्नर, बर्लिन स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रोफेसर

5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

युद्ध रशिया नव्हे, पुतीन लढतील आणि युद्ध तर होणारच आहे, अशी भविष्यवाणी करणाऱ्या निवडक व्यक्तींमध्ये डॉ. उलरिख ब्रइक्नर यांचा उल्लेख करावा लागेल. ते बर्लिन विद्यापीठात युरोपियन अफेअर्स विषयाचे प्रोफेसर आहेत. भास्करचे रितेश शुक्ल यांनी केलेली ही चर्चा.

रशिया-युक्रेन युद्धाचा उद्देश?
रशियाला तेल-गॅसमधून मोठे उत्पन्न मिळते. आता कोणीही विचारणार नाही. पायाभूत व्यवस्था नसल्याने चीनही खरेदी करणार नाही. रशियाच्या हल्ल्यामुळे नाटोची एकजूट साधली. मित्रराष्ट्र जर्मनीही दूर जात आहे. रशियाला आता चीनच्या मागे शेपटीसारखे राहावे लागेल. पुतीन यांचा दबदबाही वाढत नाही. युक्रेनमध्ये गृहयुद्ध होऊ शकते.

हे युद्ध सुरू का झाले?
पुतीन शीतयुद्ध काळात जगू लागले आहेत. म्हणूनच आजही रशियन अर्थव्यवस्था तेल, गॅस, युद्ध सामग्रीवर आधारित आहे. जगभरात मात्र क्लायमेट चेंजच्या दृष्टीने पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होत आहे. युरोपातील इतर देशांनी युद्ध सोडले. पुतीन लोकशाहीच्या विरोधात आहेत. स्वत:ला शक्तिशाली दाखवण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. याव्यतिरिक्त या युद्धाचे कारण दुसरे काही नाही.

अमेरिकेने कारवाई का टाळली?
रशियाने युद्ध सुरू केले नाही. एका व्यक्तीला सर्वोच्च मानल्यानंतर लोकांना स्वहित सोडावे लागते. रशिया व चीनच्या लोकांवर ही वेळ आली आहे. अमेरिका, युरोपातील देशांत कोणतीही एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही. तेथे संसद निर्णय घेते. म्हणूनच आक्रमणाला आक्रमणाने उत्तर दिले जात नाही.

युरोपात इंधनाची समस्या निर्माण होऊ शकते?
युद्ध सुरू करण्याची वेळदेखील रशियाच्या बाजूने नाही. मार्च महिना तोंडावर आहे. थंडी निरोपाच्या मार्गावर आहे. म्हणजेच गॅसच्या मागणीत घट होऊ लागेल.

अमेरिकेत तेजी येईल?
हा तर्कदेखील शीतयुद्धाच्या मानसिकतेतून प्रेरित आहे. अमेरिका जगातील सर्वात मोठा निर्यातदार आहे. म्हणूनच रशियाच्या जागी युरोपला आता अमेरिका हा तेलासाठी पर्याय वाटू शकतो, असे काही तज्ज्ञांना वाटू शकते. परंतु माझ्या दृष्टीने हा तर्क तितकासा वास्तवाला धरून वाटत नाही.

भारताच्या स्थितीवर मत ?
भारतासमोर आर्थिक, रणनीतिची आव्हाने आहेत. भारत तेलाचा मोठा आयातदार आहे. तेलाच्या किंमती वाढल्यावर महागाई वाढेल. लष्करीदृष्ट्या भारत रशियावर अवलंबून आहे.

डॉ. उलरिख ब्रइक्नर, बर्लिन स्टॅनफोर्ड विद्यापीठातील प्रोफेसर

बातम्या आणखी आहेत...