आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धाला 100 दिवस झालेत. पण, अद्यापही या युद्धाची धग संपली नाही. रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनला मदत करणाऱ्या देशांना नवी धमकी दिली आहे. ते म्हणाले -पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला दिर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे दिली तर रशिया नव्या ठिकाणांवर हल्ला करेल. युक्रेनला क्षेपणास्त्र दिल्यास हे युद्ध आणखी चिघळेल. असे झाले तर यापूर्वी लक्ष न करण्यात आलेल्या ठिकाणांवर हल्ले चढवले जातील.
दुसरीकडे, युक्रेनच्या सशस्त्र दलांच्या जनरल स्टाफने युद्धात आतापर्यंत रशियाच्या 31 हजार सैनिकांचा खात्मा केल्याचा दावा केला आहे. हा आकडा युद्ध सुरू झाल्यापासूनच म्हणजे 24 फेब्रुवारी ते 3 जूनपर्यंतचा आहे.
रशियाने आतापर्यंत 113 चर्च उद्ध्वस्त केले -झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यत्र व्होलोदिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी एक व्हिडिओ संदेश जारी केला. त्यात ते म्हणाले -रशिया सर्वकाही भस्मसात व संपवण्याच्या प्रयत्नांत आहे. ते धार्मिक स्थळांनाही लक्ष करत आहेत. रशियन हल्ल्यात आतापर्यंत 113 चर्च उद्ध्वस्त झालेत. यातील काही चर्च दुसऱ्या महायुद्धातून बचावलेले प्राचीन होते.
व्हिडिओत झेलेन्स्कींनी युक्रेनची जनता व सैनिकांच्या धाडसाचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, रशियाने हल्ला केला त्यावेळी कुणीही आम्हाला शत्रूचा एवढ्या दिवसांपर्यंत सामना करता याचा विचार केला नव्हता. पण, ज्या प्रकारे आम्ही रशियन सैन्याचा सामना केला त्यावरुन आमची जगभरात प्रशंसा होत आहे. हल्ल्यानंतर जगभरातील नेत्यांनी मला युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला. पण, मी माझे कुटुंब सोडून कसा जाईल.
100 हून अधिक दिवसांपासून सुरू असणाऱ्या या युद्धामुळे जनतेत भयाचे वातावरण आहे. पूर्व युक्रेनमधील ड्रूझ्किव्हका शहरातील एका मैदानी भागात एक क्षेपणास्त्र कोसळले. त्यात काही घरे व चर्चचे नुकसान झाले. हल्ल्यानंतर स्थानिकांनी घरे व चर्चा ढिगारा साफ केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.