आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन शाळांचे लष्करीकरण करू इच्छितात. त्यासाठी १६ वर्षांपर्यंतच्या शालेय मुलांसाठी लष्करी प्रशिक्षण अनिवार्य केले जाईल. तरुणाईवर पाश्चिमात्त्यांचा प्रभाव दूर करण्यासाठी अभ्यासक्रमात रशियन मूल्ये व देशभक्तीचे धडेही शिकवले जात आहेत.
जर्मन थिंक टँक फ्रेडरिक एबर्ट फाउंडेशनने राजकारण आणि भ्रष्टाचारामुळे रशियातील तरुण आपले आयुष्य सुखकर करण्यासाठी देशातील क्षमतेवर संशय घेत आहेत. एवढेच नव्हे तर अनेक तरुण युक्रेनवरील रशियाची लष्करी कारवाई योग्य ठरवत आहेत. याशिवाय लेवादामध्ये झालेल्या सर्वेक्षणात आढळले की, ८०% लोक रशिया- युक्रेन युद्धात मारल्या गेलेल्या लोकांना पुनर्जिवित करण्याचे समर्थन करत आहेत. यात ५५ वयापर्यंतचे ८७% लोक सहभागी आहेत.
ही सर्व परिस्थिती पाहता पुतीन यांच्या नेतृत्वात सोव्हियत विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी गेल्या काही वर्षांत युवा आंदोलनाला प्रोत्साहन दिले जात आहे. रशियात सुमारे १२ लाखांहून अधिक सदस्यांना जोडले जात आहे. मॉस्कोच्या व्हिक्टोरी संग्रहालयाने दुसऱ्या महायुद्धात रशियन शौर्याची प्रशंसा करत एक ऐतिहासिक प्रश्नमंजुषेचे आयोजन केले होते. त्यात मुलांना एक व्हिडिओ दाखवला आणि कोडे व देशभक्तीच्या घोषणा विचारण्यात आल्या.
युक्रेन आक्रमणाच्या समर्थनाचे प्रतीक टी-शर्टवर
पुतीन यांच्या म्हणण्यानुसार, मुलांना लष्करी जीवनाचा एक सकारात्मक अनुभव मिळाला पाहिजे. त्यामुळे त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. मुले व कर्मचाऱ्यांना युक्रेनवरील हल्ल्याच्या समर्थनाचे टी-शर्ट वाटले जात आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.