आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक निकाल:रशियात पुतीन यांच्या पक्षाला आघाडी; डाव्यांची मतेही वाढली, राष्ट्रपती म्हणून 2024 ची निवडणूक सोपी जाणार

मॉस्को / हेनरी मेयर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माॅस्को येथे मतपेटीतून मतपत्रिका मोजणीसाठी काढताना कर्मचारी. - Divya Marathi
माॅस्को येथे मतपेटीतून मतपत्रिका मोजणीसाठी काढताना कर्मचारी.

रशियातील डुमा निवडणूक निकालात पुन्हा एकदा राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची युनायटेड रशिया (यूआर) पार्टी दोन तृतीयांश जागांवर विजयी झाली आहे. सोमवारी सायंकाळी ८५ टक्के मतमोजणी पूर्ण होईपर्यंत यूआर पार्टीला जवळपास ५० टक्के मते मिळाली होती. ती २०१६ पेक्षा ४ टक्के कमी आहेत. कम्युनिस्ट पार्टीला मागील वेळेपेक्षा ७ टक्के जास्त सरासरी २० टक्के मते मिळाली. रशियन मतदानात या वेळी गडबड झाल्याचा आरोप होत आहे. विरोधी उमेदवारांचे समर्थन करणारे व्होटिंग अॅप ब्लॉक केले गेले. अधिकाऱ्यांनी अॅपल आणि गुगल स्टोरवरून हे अॅप डिलीट केले. कोरोनामुळे यावेळी मतदारांना पर्याय दिला गेला. एलडीपीआर पार्टी ७.५६ मते घेऊन तिसऱ्या आणि फेअर रशिया पार्टी ७.३८ मतांसह चौथ्या स्थानी राहिली. यूनायटेड रशिया पार्टीच्या चांगल्या प्रदर्शनामुळे २०२४ पूर्वी होणाऱ्या निवडणुकांत राष्ट्रपती पुतीन यांचेच वर्चस्व असेल.

अमेरिकेने केली गडबड, राजदूतांना दिले पुरावे
या निवडणुकीत परदेशी हस्तक्षेप झाल्याचा आरोप करण्यात आला. डुमांचे चेअरमन वॅसिली पिस्कारेव यांच्या मते सुमारे २० विदेशी संघटनांनी निवडणुकीत गडबड केली. गुगल, फेसबुक आणि यूट्यूबने सरकारविरोधी कारवायांना आश्रय देण्याचे कामही केले.

भारतीय क्षेत्रफळाइतकेच याकुटियात कम्युनिस्ट
रशियातील दुर्गम प्रांत याकुटियामध्ये या वेळी कम्युनिस्ट पार्टी विजयी झाली आहे. कम्युनिस्ट पार्टीचे पेत्रे एमुसोव यांनी२१.६ टक्के मते मिळवत ही जागा फेअर रशिया पार्टीकडून हिसकावली आहे. याकुटिया जगातील सर्वात मोठे सांंसदीय क्षेत्र आहे. त्याचे क्षेत्रफळ भारताच्या बरोबरीने आहे.

बॉक्समध्ये बोगस मत
रशियन निवडणुकीच्या व्हायरल व्हिडिओत मतदान कक्षात पुतीन समर्थकांना मतपेटील बोगस मतदान करताना दाखवले. एका व्हिडिओत महिला निर्धारित वेळेनंतरही मतपेटीत मतपत्रिका कोंबताना दिसत आहे. निवडणूक पर्यवेक्षकांची संख्या कमी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.

विरोधकांवर कारवाई
पुतीनविरोधी नेत्यांविरुद्ध सरकारने कारवाई केली. स्मार्ट व्होटिंग अॅप बंद करण्यासाठी गुगल आणि अॅपलच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अटकेची धमकी दिली गेली. टेलिग्रामवर विरोधी नेते एलेक्सी नवलनींचा स्मार्ट व्होटिंग बॉट हटवला गेला. गुगल डॉक्स व यूट्यूबवरील सरकार विरोधी सामग्री ब्लॉक केली.

बातम्या आणखी आहेत...