आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Putin's Secrete Palace Of Worth 1000 Crore, GDP Of 16 Countries Is A Fraction Of That; The Palace Have All The Luxury Facilities

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुतीन यांचा गुप्त महाल:1000 कोटी रुपये किंमत, 16 देशांचा जीडीपीही त्यापुढे तोकडा; महालात सर्व लग्झरी सुविधा असल्याचा दावा

मॉस्कोएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विरोधी नेत्याने जारी केला होता पॅलेसचा व्हिडिओ, या व्हिडिओला लाखो वेळा पाहण्यात आले

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा गुप्त महाल असल्याची माहिती उजेडात आली आहे. १.९० लाख चौरस मीटर एवढे महालाचे क्षेत्रफळ आहे. काळ्या समुद्रकिनारी हा महाल उभारण्यात आला आहे. महालाच्या चोहोबाजूंनी ४० बगिचे आहेत. या महालाची किंमत एक अब्ज डॉलरहून (सुमारे १ हजार कोटी रुपये) जास्त आहे. सिरिया, मायक्रोनेशिया, ग्रेनेडा, समोआ, किरीबाती, तुवालू इत्यादी १६ देशांचा जीडीपीदेखील त्याहून कमी आहे. पुतीन यांचे कट्टर विरोधक व विरोधी नेते एलेक्सी नवेलनी यांना १७ जानेवारी रोजी अटक झाली होती. त्याआधी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाेस्ट झाला होता. ब्लॅक सीजवळ पुतीन यांचा महाल तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यात कॅसिनो, प्रायव्हेट बार, रेड कार्पेट थिएटर, मास्टर साइझ लक्झरी बेडरूम, पोल डान्स बारसह अनेक लक्झरी सुविधाही आहेत. तेथे जाण्यासाठी एक भुयारी मार्ग आहे अशा आशयाचा व्हिडिओ जारी झाला होता. हा व्हिडिओ समोर येताच रशियात १०० हून जास्त शहरांत पुतीनविरोधी निदर्शनांना सुरुवात झाली. लोक नवेलनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यानंतर पोलिसांनी नवेलनी यांच्या पत्नींसह हजारो लोकांना अटक करून तुरुंगात डांबले.

खासगी कॅसिनो
खासगी कॅसिनो

४२ % पुतीनच्या विरोधात : पाहणी

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याविरोधात ४२ टक्के लोक पहिल्यांदा निदर्शने करत आहेत. एका पाहणीत ही गोष्ट समोर आली आहे. पाहणीनुसार रशियाच्या सर्व शहरांतील लोक पुतीनविरोधी नवेलनी यांना पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. नवेलनी यांची सुटका करण्याची लोकांची मागणी आहे.

पोल डान्स बार
पोल डान्स बार

मॉस्कोमध्ये पाच मोठे तुरुंग खचाखच

रशियात ९२३ तुरुंग आहेत. त्यापैकी ५ मोठे तुरुंग राजधानी मॉस्कोत आहेत. परंतु पुतीनविरोधी आंदोलनानंतर मॉस्कोतील सर्व तुरुंग आंदोलकांच्या कैदेमुळे खचाखच झाले आहेत. त्यामुळेच अटक झालेल्या आंदोलकांना आता बस व ट्रकमध्ये डांबले जात आहेत.

व्हिडिओ प्रचंड शोधला जातोय

स्थानिक माध्यमांनुसार नवेलनी यांनी पोस्ट केलेला हा व्हिडिओ लोक प्रचंड शोधू लागले आहेत. १७ जानेवारीपासून आतापर्यंत व्हिडिओला लाखो वेळा पाहण्यात आले आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांमध्ये संताप आहे. लोक उणे ५१ अंश तापमानातही आंदोलन करत आहेत.

लक्झरी थिएटर
लक्झरी थिएटर
बातम्या आणखी आहेत...