आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया (QUAD) या देशांची बैठक आज अमेरिकेत होणार आहे. या बैठकीसाठी चारही देशांचे राष्ट्रप्रमुख वैयक्तिक हजर राहतील. बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदी चीनशी संबंधित चिंता मांडतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारण भारताची ही चिंता स्वाभाविक आहे. चारही देशांपैकी केवळ भारताची सीमा चीनला लागते आणि विशेष म्हणजे दोन्ही देशांमध्ये अनेक दिवसांपासून सीमा विवाद देखील आहे.
बीबीसीच्या अहवालानुसार, QUAD मध्ये भारताने आपले सागरी हितसंबंध जपण्यावर भर दिला पाहिजे असे माजी डिप्लोमॅट जितेंद्र नाथ मिश्रा सांगतात. ते पुढे म्हणाले की, QUAD समुद्राशी संबंधित आपल्या हितसंबंधांचे संरक्षण कसे करू शकते, याबाबत भारताला काही कठीण प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. कारण चीन हिंद महासागरात अनेक वर्षांपासून एक आव्हान बनत चालले आहे असेही मिश्रा म्हणाले.
अन्य देशही चीनच्या धोरणांबद्दल चिंतित
चीनच्या धोरणांबद्दल केवळ भारतच नाहीतर QUAD मधील इतर तीन देशही चिंतित आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा करार (AUKUS) केला. मात्र, या करारात अद्याप भारत आणि जपान यांचा समावेश नाही. परंतु, अमेरिकेसोबत ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनने ही भागीदारी केली आहे, असे असेल तरीही भारत आणि जपानच्या दृष्टिकोनातूनही ते खूप महत्वाचे आहे. कारण या सर्व देशांना इंडो-पॅसिफिक प्रदेशात चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाला लगाम घालायचा आहे.
विश्लेषकांच्या मते, QUAD च्या या चौकटीत भारताचे अद्यापही काही महत्त्वाचे प्रश्न सुटलेले नाहीत. यातील एक प्रमुख मुद्दा म्हणजे चीनसोबतच्या सीमा वाद आहे. या व्यतिरिक्त, पाकव्याप्त काश्मीरमध्ये चीनच्या गुंतवणुकीबद्दल भारताची चिंता देखील दीर्घ काळापासून कायम आहे. तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा ताबा घेताच चीन आता अफगाणिस्तानात हस्तक्षेप वाढवत आहे. हा मुद्दाही भारतासाठी खूप महत्वाचा आहे. कारण चीन हा एकमेव भारतासाठी धोका आहे.
QUAD देशांना चीनपासून काय समस्या आहे?
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.