आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी सकाळी जपानची राजधानी टोक्योला पोहोचले. त्यात ते अनिवासी भारतीयांना संबोधित करताना म्हणाले -'माझे पालनपोषण व माझ्यावर झालेल्या संस्कारांमुळे मला लोण्यावर नव्हे तर दगडावर रेष ओढायला आवडते. आता ही माझी सवयच झाली आहे. प्रश्न मोदींचा नाही. 130 कोटी भारतीयांचा आहे. भारत आता आपला गमावलेला आत्मविश्वास पुन्हा मिळवत असून, संपूर्ण जगाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत आहे.'
भाजप-जपान नैसर्गिक भागीदार
मोदी म्हणाले -जपान आपल्या मुलांशी कमळाच्या फुलासारखा जोडलेला आहे. यामुळेच तो सुंदर दिसतो. हीच आपल्या संबंधांची कथा आहे. आपल्या संबंधांना 70 वर्ष झालेत. भारत व जपान नैसर्गिक भागीदार आहेत. आपल्या संबंधांत आत्मियता व आपलेपण आहे. हे नाते सन्मान व जगासाठीच्या समान संकल्पाचे आहे. जपानशी नाते बुद्ध व बुद्धत्वाचे आहे. आपले महाकाल जपानमध्ये गायकोतिन आहेत. आपली माता सरस्वती आहे, तर जपानमध्ये बेंजायतीन आहेत.
दोन्ही देशांत मजबूत संबंध
पंतप्रधान म्हणाले -21 व्या शतकातही भारत व जपानचे सांस्कृतिक संबंध पुढे सरकत आहेत. मी वारानशीचा खासदार आहे. शिंजो आबे काशीला आले होते तेव्हा त्यांनी रूद्राक्ष दिले. या गोष्टी आम्हाला जवळ आणतात. तुम्ही हे ऐतिहासिक नाते मजबूत बनवत आहात. आज जगाने सर्वप्रथम तथागत गौतम बुद्धांचा मार्ग अनुसरन करण्याची गरज आहे. हिंसाचार, दहशतवाद व क्लायमेट चेंजचा निपटारा करण्याचा हाच खरा मार्ग आहे. साक्षात बुद्धांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे भारत भाग्यवान आहे. आव्हान किती अवघड असले तरी भारत त्यावर तोडगा शोधतो.
मोदी म्हणाले - भारत आज विविध प्रकारच्या वैश्विक आव्हानांचा सामना करत आहे. क्लायमेट चेंज खूप मोठे संकट बनले आहे. आम्ही या आव्हानावर तोडगाही शोधला आहे. 2070 पर्यंत भारताने झिरो कार्बन उत्सर्जनाचे उद्दीष्ट ठेवले आहे. आंतरराष्ट्रीय सोलार आघाडीलाही आमचा पाठिंबा आहे. आम्ही प्रत्येक समस्येतून बोध घेऊन त्यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न करतो.
जगातील 40 टक्के डिजिटल व्यवहार भारतात
भारतातील ग्रामीण भागात राहणाऱ्या जनतेसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रांसफरने खूप मोठी मदत केली आहे. याचे कारम डिजिटल रिव्होल्यूशन आहे. संपूर्ण जगात डिजिटल व्यवहार होतात. त्यातील 40 टक्के एकट्या भारतात होतात. आम्हाला याचा अभिमान वाटतो. कोरोनाच्या काळात जेव्हा सर्वकाही बंद होते. तेव्हाही आम्ही एका क्लिकवर कोट्यवधी भारतीयांना मदत पोहोचवली, असेही मोदी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सोमवारी सकाळी जपानची राजधानी टोकियो येथे आगमन झाले. QUAD समिटमध्ये सहभागी होण्यासाठी मोदी येथे आले आहेत. जपानमध्ये मोदींचे आगमन होताच भारतीय समुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. भारतीय म्हणाले - ज्यांनी काशी सजवली ते टोकियोला आले आहेत. पंतप्रधान मोदी मंगळवारी सायंकाळपर्यंत येथे थांबणार आहेत.
40 तासांच्या जपान दौऱ्यात पंतप्रधान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा आणि ऑस्ट्रेलियाचे नवनिर्वाचित पंतप्रधान अँथनी अल्बनीस यांची भेट घेणार आहेत. टोकियोमध्ये 40 तासांच्या वास्तव्यादरम्यान, पंतप्रधान जपानमधील 35 व्यावसायिक नेत्यांची आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीही भेट घेतील. यादरम्यान ते 23 बैठकांमध्ये भाग घेणार आहेत.
जपानमध्ये मोदी
जपानमधील बिझनेस लीडर्ससोबत बैठक
जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी जपानमध्ये पोहोचले आहेत. ते म्हणाले की, यावर्षी मार्चमध्ये भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी किशिदा भारतात आले होते. आमच्या टोकियो भेटीदरम्यान, आम्ही भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीवर चर्चा करू.
रशिया-युक्रेन मुद्द्यावर मोदी-बायडेन बोलणार
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन टोकियोमध्ये द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांसोबतच रशिया-युक्रेन मुद्द्यावरही चर्चा होणार आहे.
23 मे रोजी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
24 मे रोजी पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.