आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Quad Countries Vs China Power; India America Japan And Australia Meeting Today Over Indo Pacific; News And Live Updates

QUAD ची सर्वात मोठी बैठक:भारताने अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानचा हस्तक्षेप आणि दहशतवादाचा मुद्दा केला उपस्थित, अमेरिकेनेही दिला पाठिंबा

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • QUAD देशांना चीनपासून काय समस्या आहे?

भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया (QUAD) या देशांच्या राष्ट्रप्रमुखांची पहिली वैयक्तिक बैठक शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये पार पडली. ही बैठक आयोजित केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आभार मानले. आमचा लसीचा उपक्रम इंडो-पॅसिफिक देशांना खूप मदत करेल असे मोदी म्हणाले.

परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्या म्हणण्यानुसार, भारताने QUAD बैठकीत अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानची भूमिका आणि दहशतवादामध्ये सहभागी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विशेष म्हणजे या मुद्द्याला अमेरिकेनही पाठिंबा दिला आहे. कारण दोन्ही देश अफगाणिस्तानातील दहशतवादाचा सामना करण्याचे महत्त्व समजून आहेत.

भारत : मोदी काय म्हणाले?
QUAD एक 'फोर्स फॉर ग्लोबल गुड' म्हणून काम करेल. QUAD मधील आमचे सहकार्य हिंद-प्रशांत तसेच संपूर्ण जगात शांतता आणि समृद्धी सुनिश्चित करेल असा विश्वास असल्याचे मोदी म्हणाले. QUAD लस उपक्रम इंडो-पॅसिफिक देशांना मदत करणार असून QUAD ने सामायिक लोकशाही मूल्यांसह पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. QUAD पुरवठा साखळी, जागतिक सुरक्षा, हवामान बदल आणि कोरोना महामारीसारख्या अनेक मुद्द्यांवर एकत्र काम करत असल्याचे म्हणाले.

अमेरिका : बायडेन काय म्हणाले?
मी पंतप्रधान मॉरिसन, मोदी आणि सुगा यांचे व्हाईट हाऊसमध्ये होत असलेल्या पहिल्या वैयक्तिक QUAD बैठकीत स्वागत करतो. हा लोकशाही देशांचा समूह असून ज्यांचे हित समान आहेत. चारही देश सध्या समान आव्हानांना सामोरे जात आहेत. आमचा मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेशावर विश्वास आहे असे बायडेन म्हणाले.

लसीकरण उपक्रमासाठी आमची योजना ट्रॅकवर आहे. जागतिक पुरवठा सुधारण्यासाठी आम्ही लवकरच भारतात 1 अब्ज डोस तयार करणार आहोत. आम्ही 6 महिन्यांपूर्वी मुक्त इंडो-पॅसिफिकच्या अजेंडावर काम करण्यास सुरुवात केली होती. यामध्ये आपण खूप पुढे आलो आहोत, हे सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे. बायडेन यांनी नवीन QUAD फेलोशिपची घोषणा केली असून हे भारत, ऑस्ट्रेलिया आणि जपानमधील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे.

ऑस्ट्रेलिया : स्कॉट मॉरिसन काय म्हणाले?
लोकशाही देश एकत्र कसे काम करू शकतात हे QUAD गटाने सिद्ध होत आहे. कारण जगातील कोणताही भाग सध्या इंडो-पॅसिफिकपेक्षा अधिक गतिशील नाहीये असे मॉरिसन म्हणाले.

जपान : मीटिंगमध्ये सुगा काय म्हणाले?
सुगा म्हणाले की, चार देश प्रथमच वैयक्तिकरित्या QUAD नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी एकत्र आले आहेत. ही परिषद आमचे सामायिक संबंध, मुक्त आणि खुले इंडो-पॅसिफिक क्षेत्रासाठी आमची वचनबद्धता दर्शवते. अमेरिकेने जपानी खाद्यपदार्थांवर बंदी घातली होती, ती एप्रिलमध्ये विनंती केल्यानंतर मागे घेण्यात आली. यामुळे सुगा यांनी बायडेन यांचे आभार मानले.

QUAD देशांना चीनपासून काय समस्या आहे?

  • भारतासाठी चीनची वाढती लष्करी आणि आर्थिक ताकद हे एक आव्हान आहे. कारण चीनने दक्षिण चीन समुद्रातील बेटांवर कब्जा केला असून तेथे लष्करी मालमत्ता विकसित केली आहे. तर दुसरीकडे, चीन हिंदी महासागरातील व्यापार मार्गांवर आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, जी भारतासाठी चिंतेची बाब बनत चालली आहे.
  • अमेरिकेचे धोरण पूर्व आशियात चीनवर नियंत्रण ठेवण्याचे आहे. या कारणास्तव, ते QUAD ला इंडो-पॅसिफिक प्रदेशात पुन्हा वर्चस्व मिळवण्याची संधी म्हणून पाहत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने आपल्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणात रशियासोबतच चीनलादेखील प्रतिस्पर्धी म्हटले आहे.
  • ऑस्ट्रेलियाला त्यांच्या जमीनी, पायाभूत सुविधा, राजकारण आणि विद्यापीठांमध्ये चीनच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता आहे. ऑस्ट्रेलियाचे चीनवरील अवलंबित्व इतके जास्त आहे की, त्याने चीनबरोबर व्यापक धोरणात्मक भागीदारी सुरू ठेवली आहे.
  • जपानला गेल्या दशकात चीनपासून सर्वाधिक त्रास झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे जपानची अर्थव्यवस्था मुख्यत्वे चीनसोबतच्या व्यापारावर अवलंबून आहे. यामुळे, जपान आपल्या आर्थिक गरजा आणि चीनशी प्रादेशिक संतुलिन व्यवस्थित ठेवण्यासाठी चिंतेत आहे.
बातम्या आणखी आहेत...