डर्बीशायरमध्ये ३५० वर्षांपूर्वी प्लेगचा फैलाव झाल्याने २६० जणांचा मृत्यू, गावाने स्वत: केले होते क्वॉरंटाइन

  • मृतांवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले ती आज जागा आजही आहे

वृत्तसंस्था

Mar 24,2020 11:00:00 AM IST

लंडन - इंग्लंडमधील डर्बीशायरचे इयाम गाव, प्लेग व्हिलेज नावाने आेळखले जाते. वर्ष १६६५-६६ मध्ये येथे प्लेग पसरला होता. त्यात त्यावेळी २६० लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांवर जेथे अंत्यसंस्कार करण्यात आले ती आज जागा आजही आहे. येथे मृतांच्या स्मरणार्थ त्यांच्या कबरीवर दगड ठेवले आहेत. तेव्हा ७०० लोकसंख्येच्या या गावाने स्वत:ला ६ महिन्यांसाठी क्वॉरंटाइन केले होते. यामुळे हजारो जीव वाचले. एक महिला जिचे नाव एलिझाबेथ होते, ती त्यावेळी मृत पती आणि ६ मुलांच्या मृतदेहासोबत ८ दिवस राहिली होती. आता कोरोना व्हायरसच्या तडाख्यात पूर्ण ब्रिटन आल्याने गावाचा इतिहास बघून स्थानिकांनी स्वत:ला वेगळे करून घेतले आहे.

X