आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटेनच्या महाराणी एलिजाबेथ-II यांचे पती प्रिंस फिलिप यांचे शुक्रवारी निधन झाले, ते 99 वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वीच त्यांची हार्ट सर्जरी झाली होती. इन्फेक्शननंतर त्यांना किंग एडवर्ड हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. येथे 28 दिवस राहिल्यानंतर 16 मार्च 2021 ला त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. प्रिंस फिलिप यांनी जानेवारी महिन्यात महारानीसोबत कोरोना लस घेतली होती.
बकिंघम पॅलेसकडून जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले की, हिज रॉयल हायनेस द प्रिंस फिलिप, ड्यूक ऑफ एडिनबर्ग या जगात नाहीत. रॉयल हायनेस यांचे आज सकाळी विंडसर कॅसेलमध्ये निधन झाले. प्रिंस फिलिप यांनी 2017 मध्ये आपल्या सर्व जबाबदारीतून रिटायरमेंट घेतली होती. तेव्हापासून ते कधीतरीच सार्वजनिक कार्यक्रमात दिसत होते.
ब्रिटिश राज कुटुंबातील सर्वात वृद्ध व्यक्ती
प्रिंस फिलिप यांचा जन्म 10 जून 1921 ला ग्रीसमध्ये झाला होता. ते ब्रिटिश इतिहासातील सर्वाधिक राज्य करणारे राजा होते. तसेच, ब्रिटिश राज कुटुंबातील सर्वात वृद्ध सदस्य होते. ग्लुक्सबर्ग राजघरातील सदस्य असलेल्या फिलिप यांचा संबंध यूनानी आणि डेनिश राज कुटुंबाशी होता.
नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
प्रिंस फिलिप यांच्या निधनावर अनेक देशांच्या प्रमुखांनी शाही कुटुंबाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडियावरुन त्यांना श्रद्धांजली दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.