आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉशिंग्टन:पॉवेल यांच्या मृत्यूनंतर कोरोना लसीच्या परिणामावर प्रश्नचिन्ह

वॉशिंग्टन / एमिली अथेन्स3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री काॅलिन पॉवेल यांच्या निधनामुळे अमेरिकाच नव्हे जगभरात काेराेना लसीच्या परिणामावरून अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. वास्तविक संशाेधकांनी ही चर्चा आणि शंका-कुशंकांना फेटाळून लावले आहे. पाॅवेल ८४ वर्षांचे हाेते. त्यांचे साेमवारी काेराेना संसर्गामुळे निधन झाले हाेते.पाॅवेल यांनी या वर्षी फेब्रुवारीत काेराेनाचे दाेन्ही डाेस घेतले हाेते. त्यांना फायझन-बायाेएनटेकची लसही देण्यात आली हाेती. कंपनीने एप्रिलमध्ये काेराेनाविराेधातील लस ९१.३ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला हाेता. पाॅवेल यांना गेल्या आठवड्यात बूस्टर डाेसही दिला जाणार हाेता. परंतु त्याआधीच त्यांना काेराेना संसर्ग झाला हाेता. त्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागले.

दीर्घकाळापासून त्यांची सहकारी राहिलेल्या पेगी सिफरीनाे म्हणाल्या, पाॅवेल यांच्या बाेन मॅराेमध्ये ट्यूमर हाेता. श्वेत रक्तपेशींचा कर्कराेग हाेता. पार्किन्सनचा आजारही हाेता. या सर्व आजारांवर उपचार सुरू हाेते. वृद्ध पाॅवेल यांची राेगप्रतिकारशक्ती या सर्व आजारांमुळे कमी झाली हाेती. म्हणूनच त्यांना संसर्गही झाला. पाॅवेल हायप्राेफाइल व्यक्ती हाेते. काेणतीही गाेष्ट १०० टक्के प्रभावी नसते. परंतु लस प्रभावी आहे हे स्पष्ट दिसून येत आहे. लसीमुळे अनेक प्रकारच्या जाेखमी कमी झाल्या. डाॅक्टर पाॅल फिलाडेल्फियाच्या चिल्ड्रन्स हाॅॅस्पिटलमध्ये व्हॅक्सिन एज्युकेशन सेंटरचे संचालक आहेत. अशाच प्रकारे ह्यूस्टनचे बायलर काॅलेज आॅफ मेडिसिनमध्ये नॅशनल स्कूल आॅफ ट्राॅपिकल मेडिसिनचे डीन डाॅक्टर पीटर हाेटेजही विश्वास दर्शवतात. ते म्हणाले, काही समुदायाला जाेखीम जास्त प्रमाणात आहे. म्हणूनच कधी-कधी लसीकरण झाल्यानंतर मृत्यू झाल्याची प्रकरणे समाेर येत आहेत. परंतु त्यामुळे चिंतेची गरज नाही.

काेराेना लस आल्यानंतरच्या अभ्यासातून विश्वासात वाढ
न्यूयाॅर्क टाइम्सने गेल्या काही दिवसांत ४० राज्यांतील आकडेवारीचे विश्लेषण केले. त्यानुसार या राज्यांत काेराेनामुळे झालेल्या एकूण मृतांमध्ये दाेन्ही डाेस घेतलेल्यांचे प्रमाण केवळ ०.२ टक्के ते सहा टक्क्यांपर्यंत आहे. केंद्रीय महामारी नियंत्रण तथा प्रतिबंधक आकडेवारीनुसार अमेरिकेत १८.७ काेटींहून जास्त लाेकांनी दाेन्ही डाेस घेतलेले आहेत. त्यात ७ हजार १७८ लाेकांचा लस घेतल्यानंतरही काेराेनामुळे मृत्यू झाला. त्यातही ८५ टक्क्यांहून जास्त लाेक ६५ वर्षीय किंवा जास्त वयाचे हाेते.

बातम्या आणखी आहेत...