आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Radha Iyengar, An Indian National, Has Been Recommended For The Post Of Pentagon's Deputy Secretary Of Defense

मोठ्या पदासाठी शिफारस:पेंटागॉनच्या उपसंरक्षण सचिव पदावर भारतवंशीय राधा अय्यंगर यांची शिफारस

वॉशिंग्टन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारतवंशीय राधा अय्यंगर प्लंब यांच्या नावाची संरक्षण मुख्यालयाच्या पेंटागॉनमध्ये मोठ्या पदासाठी शिफारस केली आहे. राधा संरक्षण संपादन तसेच देखभाल विभागाच्या उपसंरक्षण सचिव म्हणून काम करतील. त्या सध्या संरक्षण क्षेत्रातील उपमंत्र्यांसाठी चीफ ऑॅफ स्टाफ म्हणून कार्यरत आहेत. राधा यांना धोरण-संशोधन व सुरक्षा प्रकरणातील अनुभव आहे. त्यांनी फेसबुकमध्ये पॉलिसी अॅनालिसिसच्या ग्लोबल हेड राहिलेल्या आहेत. त्यांनी गूगलमध्येही काम केले आहे. राधाने लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून देखील काम केले आहे.

बातम्या आणखी आहेत...