आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाॅशिंग्टन:महिलांना किरणाेत्सर्गामुळे कर्कराेग, थायराॅइडचा धाेका असल्याने अंतराळ उड्डाण कमी

वाॅशिंग्टन4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत ६७ महिला अंतराळ प्रवासी बनल्या आहेत. परंतु आराेग्याच्या कारणांमुळे महिलांना अंतराळात पाठवण्याचे कार्यक्रम कमी प्रमाणात आखण्यात आले. अंतराळ प्रवाशांना अवकाशात उच्च पातळीवरील हानिकारक किरणाेत्सर्गाला ताेंड द्यावे लागते. अशा किरणांच्या संपर्कात आल्याने माणसाच्या नर्व्ह सिस्टिमला धाेका निर्माण हाेताे. त्यामुळे कर्कराेग, हृदयराेगाची शक्यता वाढते. या घातक किरणांचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत महिलांवर जास्त हाेताे, असा दावा संशाेधकांनी केला आहे. अंतराळातील किरणाेत्सर्गाच्या परिणामांचा अभ्यास करणे कठीण काम आहे. नासा दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानवर डागलेल्या अणुबाॅम्बच्या पीडितांचा अभ्यास करत आहे. त्यात किरणांच्या संपर्कात आल्यानंतर पुरुषांच्या तुलनेत महिलांना कर्कराेग हाेण्याचा धाेका जास्त असल्याचे दिसून आले. महिलांना स्तनाचा कर्कराेग, थायराॅइड हाेऊ शकताे. म्हणूनच महिला अंतराळ प्रवाशांना माेहिमेवर पाठवण्याचे प्रमाण कमी आहे.

अंतराळात ३० वर्षांची महिला जास्तीत जास्त १८० मिलीसिवटर्स (एमएसव्ही) एवढे प्रमाण सहन करू शकतात. पुरुष मात्र ४०० एमएसव्हीचा सामना करू शकतात. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर १८० दिवसांच्या प्रवासात सरासरी ५०-१२० एमएसव्हीच्या संपर्कात यावे लागते. नासाच्या अंतराळ माेहिमेचे माजी प्रमुख पेगी व्हिट्सन म्हणाले, संशाेधनानुसार पुरुषांच्या तुलनेत महिला ४५-५० टक्के वेळा अंतराळ भ्रमंती करू शकतात. त्यामुळेच आता सगळ्या प्रकारच्या अंतराळ प्रवाशांना ६०० एमएसव्ही किरणांचा सामना करण्यास सक्षम करणारी यंत्रणा विकसित करण्यावर नासाने काम सुरू केले आहे.

फंकच्या अंतराळ सफरीमुळे महिलांच्या आशा पल्लवित
महिला अंतराळ प्रवासी व्हॅली फंकने जेफ बेजाेसच्या न्यू शेपर्ड उड्डाणातून अंतराळाची सफर केली. महिला अंतराळ प्रवाशांसाठी हा मैलाचा दगड ठरला. परंतु अंतराळ क्षमता असूनही १९६१ मध्ये अशा प्रकारची याेजना रद्द करण्यात आली हाेती. व्हॅली फंकने १९६० च्या दशकात नासाच्या अंतराळ प्रवासी म्हणून आवश्यक सर्व तपासण्या यशस्वी पूर्ण केल्या हाेत्या. परंतु त्यांना अंतराळ जाण्याची संधी मिळाली नव्हती. आता त्या ८२ वर्षांच्या असून त्यांना अजूनही आपले स्वप्न साकार हाेईल, अशी आशा वाटते.

बातम्या आणखी आहेत...