आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमेरिकेत भारतीयवंशाच्या नागरिकांचा प्रभाव जगजाहीर आहे. साधारण ३४ कोटी लोकसंख्येपैकी केवळ ४५ लाख भारतीय आहेत. असे असतानाही भारतीय समुदाय अमेरिकी प्रसारमाध्यमांमध्ये छाप सोडतो. अमेरिकेच्या प्रमुख मीडिया संस्था भारतीयांशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्याने कव्हर करतात. याशिवाय एका डझनापेक्षा जास्त वेबसाइट्सही भारतीयांशी संबंधित मुद्द्यांवर वार्तांकन करतात. दुसरीकडे, भारतीयांना मीडियात मिळणाऱ्या प्रसिद्धीवरून उजव्या विचारसरणीचा आणि वर्चस्ववादी वर्ग संतप्त झाला आहे. अनेक श्वेतवर्णीय अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर भारतीयांचे तुष्टीकरण केल्याचा आरोप ठेवत आहेत. उजव्या विचाराच्या फॉक्स न्यूज चॅनलवर भारतीय श्वेतवर्णीयांवर वरचढ होणारे बाहेरचे लोक या दृष्टीने सादर केले जाते. भारतीयांवर गोऱ्या लोकांच्या नोकऱ्या आणि स्रोत हिरावून नेल्याचे आरोप लावले जातात.
कट्टरपंथीयांच्या अनेक वृत्तवाहनि्या बायडेन यांचे भारतीय-अमेरिकींवर दिलेल्या वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवतात. बायडेन यांनी म्हटले होते की, भारतीय एवढे चांगले आणि कुशल आहेत की ते सर्व मोठी कामे करत आहेत आणि देश सांभाळत आहेत. श्वेत वर्चस्ववादी आणि वर्ण गटांनी या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेतल्यावर व्हाइट हाऊसला अखेर स्पष्टीकरण द्यावे लागले होते. अमेरिकेत भारतीय एकमेव अल्पसंख्याक समुदाय आहे, ज्यांना मुख्य प्रवाहातील मीडिया संस्था मोठ्या प्रमाणात कव्हरेज देतात. भारतीयांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्यांना सीएनएन, न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉशिंग्टन पोस्टसारखी मोठी मीडिया घराणी जागा मिळते. यातून अमेरिकेतील भारतीय स्थलांतरीतांची शक्ती आणि प्रभावाचे दर्शन घडते.
एक डझन वेबसाइट करतात कव्हर : अमेरिकेत भारतीय समुदायासाठी समर्पित अनेक वेबसाइट्सचीही मोठी चर्चा होते. “अमेरिकन कहानी, इंडिका न्यूज, इंडिया अब्रोड, न्यूज इंडिया, अमेरिकन बाजार और अखबार’’ या वेबसाइट्स भारतीयांवर परिणाम करणारे सरकारी निर्णय, घटना आणि कार्यक्रमांचा सविस्तर वृत्तांत देतात.
विशेष म्हणजे, यामध्ये उजव्या आणि डाव्या विचारसरणीचे प्रतनििधित्व मिळते. यासोबत स्थलांतरीत भारतीयांची बदलती संस्कृती आणि जीवनशैलीचीही रिपोर्टिंग केली जाते. दरमहा २० लाखांपेक्षा जास्त लोक ते वाचतात. अनेक कंपन्या, स्टोअर, रेस्तराँ या वेबसाइटवर आपली सामग्री आणि सेवेची जाहीरात करू इच्छितात.
हेट क्राइमविरुद्ध लढण्यासाठी सरकारकडून मिळाला निधी न्यूयॉर्क ,कॅलिफोर्नियात आशियाई-अमेरिकी लोकांविरोधातील द्वेषमूलक गुन्ह्यांविरुद्ध मोहीम चालवल्यामुळे सरकारने अनेक वेबसाइट्सना निधी देणे बंद केले होते. या हेट क्राइमचे रिपोर्टिंग करत होत्या. अनेक वेसाइट्सना भारतीयांवरील हेट क्राइमला कव्हर केल्याबद्दल ४० कोटी ८३ लाखापेक्षा(५० लाख डॉलर) जास्त निधी मिळाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.