आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Trains Accident In Pakistan Two Train Collide Atleast 30 Killed 50 Injured In Sindh Ghotki District; News And Live Updates

पाकिस्तानमध्ये रेल्वे अपघात:सिंधमधील डहारकी भागात 2 प्रवाशी गाड्यांची टक्कर; 30 ठार, 50 पेक्षा जास्त जखमी

इस्लामाबाद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही घटना घोटकीजवळील रेती ते डहारकी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 3:45 वाजता घडली

पाकिस्थानमध्ये सोमवारी पहाटे मोठा रेल्वे अपघात झाल्याचे समोर येत आहे. हा अपघात पाकिस्थानातील सिंधमधील डहारकी भागात झाला असून यामध्ये दोन पॅसेंजर गाड्यांची टक्कर झाली. दरम्यान, यामध्ये आतापर्यंत 30 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर 50 पेक्षा जास्त प्रवाशी गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, हा अपघात मिल्लत एक्स्प्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेसमध्ये झाला आहे. त्यामुळे आणखी जास्त प्रवाशी बोगींमध्ये अडकले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

घोटकीजवळ झाला अपघात
ही घटना घोटकीजवळील रेती ते डहारकी रेल्वे स्थानकादरम्यान पहाटे 3:45 वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मिलत एक्सप्रेस कराचीहून सरगोधाकडे तर सर सय्यद एक्सप्रेस रावळपिंडीहून कराचीकडे जात होती.

पाकिस्तानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, ही घटना 3.30 ते 4 वाजे दरम्यान घडली. मिल्लत एक्स्प्रेस ट्रॅकवरुन धावत असताना त्याच्या बोगी नियंत्रणाबाहेर जात दुसर्‍या ट्रॅकवर पडल्या. त्यामुळे समोरून दुसऱ्या रुळावरुन येणारी सर सय्यद एक्स्प्रेस त्यांच्याशी धडकली आणि हा अपघात घडला. या अपघातामुळे बोग्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

चार तासानंतर घटनास्थळी पोहचले बचाव दल
ही घटना घडल्यानंतर बचाव दलाचे अधिकारी चार तासानंतर घटनास्थळी पोहचले. दरम्यान, त्यांनी बोगीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. हा अपघात मोठा असल्याने बोगीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे बोगींना गॅस कटरने कापून प्रवाशांना बाहेर काढावे लागत होते. गंभीर प्रवाशांना ट्रॅक्टर-ट्रॉलीने रुग्णालयात दाखल करण्यात येत होते. या अपघातामुळे या मार्गावरील बहुतांश रेल्वेंच्या हालचालीवर परिणाम झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...