आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Raising Children In America Became More Expensive, The Cost Of Raising A Child For 17 Years Was 6.40 Crores

अमेरिकेत महागाई:अमेरिकेत मुलांचे पालन-पोषण करणे झाले महाग; 17 वर्ष मुलांचा पालन-पोषण करण्याचा खर्च 6.40 कोटी रुपये

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेत महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या वाढत्या महागाईमुळे मुलांचे पालन-पोषण करणे मुश्किल झाले आहे. तसेच मुलांचे पालन-पोषण करण्यासाठी 8 लाख डॉलर्स किंवा 6.40 कोटी रुपये खर्च येतो. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान खर्च केलेला पैसा यातून वजा केला तर, मुलांच्या पालन-पोषणासाठी 3 लाख डॉलक म्हणजे 2.48 कोटी रुपये खर्च येतो.

2017 च्या तुलनेत हा खर्च 64 लाखांनी वाढला आहे. हा खर्च फक्त 17 वर्षे वयापर्यंत आहे. हे आकलन केवळ मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी आणि ज्यांचे आई-वडील दोन्ही कमवतात त्यांचासाठी. अमेरिकेत महाविद्यालीन शिक्षण 4 वर्षांचे असते. यासाठी एका कुटुंबाला 5 लाख डॉलर म्हणजे 4 कोटी रुपये होतो.

शिक्षणा व्यतिररिक्त असा आहे मुलांचा खर्च

  • मुलाला शिक्षणासाठी कॉलेजला पाठवले नाही तर, त्याचे पालन-पोषणसाठी त्याला 4 कोटी रुपये कमी पडतात.
  • 2021 च्या यूएस जनगणनेच्या अहवालानुसार, 2020 मध्ये सरासरी कौटुंबिक उत्पन्न $67,521 म्हणजेच 53.92 लाख रुपये आहे. 2019 च्या सरासरी उत्पन्नातून 2 लाख जे रु. कमी होते.
  • 2020 मध्ये गरिबीचे प्रमाण 11.4% होते, जे 2019 च्या तुलनेत 1 टक्क्यांनी वाढले

अमेरिकत माता कमी मुलांना जन्म देऊ इच्छितात

मातृत्व सर्वेक्षणात असे आढळून आले की सहस्राब्दी (वय 26 ते 41) आणि जेन-झेड (वय 10 ते 25) यांनी आणखी मुले जन्माला घालण्याची योजना आखली नाही. 2022 मध्ये 30% मातांनी सांगितले की, त्यांना अधिक मुले हवी आहेत. 2020 मध्ये, 43% लोकांनी अधिक मुले होण्याची इच्छा व्यक्त केली होती. वाढत्या महागाईमुळे लोकांना जास्त मुले नको आहेत.

बातम्या आणखी आहेत...