आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरवापसी:पुढील आठवड्यापर्यंत श्रीलंकेत परत येऊ शकतात राजपक्षे, जुलैत देश सोडून जावे लागले होते

कोलंबो3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे पुढील आठवड्यापर्यंत मायदेशी परतू शकतात. जनतेच्या तीव्र विरोधानंतर त्यांना जुलैत देश सोडून जावे लागले. यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिला. राजपक्षे २४ ऑगस्टपर्यंत मायदेशी परतू शकतात, असा संकेत रशियातील श्रीलंकेचे माजी राजदूत उदयंगा वीरातुंगा यांनी दिला.

त्यांना फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक केली होती व काही महिन्यांनंतर जामिनावर सुटका केली होती. गोतबायांच्या राजकीय भवितव्याबाबत वीरतुंगा म्हणाले, ‘ते राजकीय नेते म्हणून कुशल शासक होऊ शकले नाहीत. त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, असे वाटत नाही.’

बातम्या आणखी आहेत...