आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळच्या जनकपुरीतून भास्कर रिपोर्ट:जानकी मंदिरात शोभायात्रा, पशुपतिनाथाला रुद्राभिषेक

काठमांडूएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रीलंका सीता अम्मान मंदिरात दीपोत्सव

शरयू नदीच्या तीरावरून बुधवारी प्रभू रामचंद्राचा जयघोष सीमेपार ५०० किमी दूर माता जानकीचे स्थळ म्हणजे नेपाळमधील जनकपूर येथे पोहोचला. जनकपूरच्या जानकी मंदिरात बुधवारी उत्सवाचे वातावरण होते. मंत्रोच्चारात अयोध्येत रामलल्लाच्या मंदिराचे भूमिपूजन सुरू असताना त्याच वेळी जानकी मंदिरासह नेपाळच्या सर्व प्रमुख मंदिरांत खास कार्यक्रम साजरे होत होते. जानकी मंदिर विश्वस्तांनी सांगितले, मंदिराचे महंत राम तपेश्वरदास एक किलो चांदीच्या पाच विटा घेऊन अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले होते. जानकी मंदिरात अखंड रामायण पाठ करण्यात आला.

भारतात अयोध्या व नेपाळच्या जनकपूरचा संबंध पूर्वापार काळापासून आहे. जानकी मंदिरापासूनच पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नेपाळ दौऱ्यास सुरुवात केली होती. राम जन्मभूमीवर मंदिराचे बांधकाम सुरू होण्याच्या शुभकार्याचा आनंद संपूर्ण नेपाळमध्ये दिसून आला. काठमांडूच्या पशुपतिनाथ मंदिरात मुख्य पुजारी मूल भट्ट यांच्या नेतृत्वाखाली संहिता शास्त्री अर्जुनप्रसाद बास्तोला यांनी रुद्राभिषेक केला. बास्तोला म्हणाले, शिव व रामाचा संबंध अलौकिक आहे. शिवाशिवाय प्रभू रामचंद्राला कोणी जोडला जाऊ शकत नाही. पूर्वांचल सीमेलगतच्या रुपनदेही, नवलपरासीपासून काठमांडूपर्यंत लोकांनी फटाक्यांची आतषबाजी केली. गौतम बुद्धांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनीमध्ये लोकांनी घराबाहेर येऊन आनंद साजरा केला. विश्व हिंदू परिषद नेपाळच्या आवाहनानंतर येथे तीन टप्प्यांत कार्यक्रम घेण्यात आले. अयोध्येत कोनशिला ठेवण्यात येईपर्यंत मंदिरात व घरांमध्ये श्रीरामांचे पाठ सुरू होते. सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.

श्रीलंका सीता अम्मान मंदिरात दीपोत्सव

श्रीलंकेच्या न्यूवार इलिया पर्वतरांगांच्या प्रदेशात असलेल्या सीता अम्मान मंदिरात राम मंदिराचा पायाभरणी समारंभ पार पडल्यानंतर विशेष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिर व्यवस्थापन समितीचे सुब्रमण्यम थोगी यांनी सांगितले, संपूर्ण मंदिर परिसरात शुद्ध देशी तुपाचे दिवे लावण्यात आले होते. हनुमान चालिसाचा पाठ घेण्यात आला. रावणाने सीतेचे अपहरण करून याच स्थानी आणून ठेवले होते, अशी आख्यायिका आहे.

बातम्या आणखी आहेत...