आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनामुळे रडण्याची संधी न मिळाल्याने मेक्सिकोत रडण्याची स्पर्धा; 2 मिनिटांचे व्हिडिओ मागवले, धाय मोकलून रडणारी अभिनेत्री जिंकली

मेक्सिकाे सिटी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महामारीत सर्वात चांगले रडणाऱ्याचा शोध, 2020 बद्दल शोक केलेला व्हिडिओ ठरला वेगळा

उत्तर अमेरिकेतील मेक्सिको या देशात दरवर्षी १ नोव्हेंबरला मृतांचा दिवस (द डे ऑफ द डेड) साजरा केला जातो. या दिवशी लोक पूर्वजांच्या कबरीवर जातात. त्यांच्या आवडीच्या वस्तूंनी ती सजवतात आणि रडतात. सामूहिकपणे उत्सवही साजरा करतात. मात्र, या वर्षी कोरोनामुळे सर्व कब्रस्तान बंद आहेत. लोक रडू शकले नाहीत. जिवलगांच्या मृत्यूचा उत्सव साजरा करण्याची संधी मिळाली नाही. पण सॅन जुआन डेल रिओ शहराने दरवर्षीची रडण्याची स्पर्धा कायम ठेवली. तीत दरवर्षी लाइव्ह परफॉर्मन्स द्यावा लागतो. यंदा व्हर्च्युअल आयोजन झाले. ई-मेलद्वारे २-२ मिनिटांचे व्हिडिओ मागवण्यात आले. विशेष म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट प्रवेशिका आल्या. सर्वात चांगले रडणाऱ्याची निवड म्हणजे प्राचीन परंपरेचा सन्मान आहे. तीत एखाद्याचा मृत्यू झाल्यावर रडण्यासाठी महिलांना भाड्याने बोलावले जात असे.

रडण्याच्या या स्पर्धेची विजेती ठरली कॅलिफाेर्नियाची प्रिन्सेसा कॅटलिना चावेझ. पेशाने अभिनेत्री असलेली चावेझ कधी रडली नव्हती, पण या वर्षी तिला खूप रडावे लागले. कोरोनाने मला रडण्यास भाग पाडले, असे ती म्हणाली. तिने एका अज्ञाताच्या कबरीजवळ बसून व्हिडिओ बनवला. त्यासाठी परवानगीही घेतली. द्वितीय क्रमांकावरील ५८ वर्षीय सिल्वेरिया बाल्डेरास रुबियो म्हणाली की, मी यापूर्वी रडणाऱ्या महिलांना पाहिले होते. त्यांच्यासारखीच रडले आणि जिंकले. ब्रँडा अनाकेरेनचा व्हिडिओ सर्वात वेगळा ठरला. तिने वर्ष २०२० बद्दल शोक व्यक्त करणारा व्हिडिओ बनवला. ३१ वर्षीय ब्रेंडा म्हणाली, या वर्षातील आघात माझ्या व्हिडिओसाठी प्रेरणा ठरले. पर्यटन विभागाचे प्रमुख एजुअर्डो गुइलेन यांच्या मते, मृत्यूबद्दल शोक व्यक्य करणेच नव्हे तर हसणेही मेक्सिकोच्या संस्कृतीचा भाग आहे. समस्यांशी सामना करण्याची ही एक पद्धत आहे.

अनेकांनी नाट्यमय व्हिडिओ बनवले. काहींनी कबरीजवळ बसून धाय मोकलून रडण्याचे व्हिडिओ पाठवले. काहींनी हास्यास्पद प्रकारही केले. एका महिलेने घरातच फुलांचा गुच्छ ठेवून रडण्याचा अभिनय केला. हे व्हिडिओ पाहून पॅनलमधील परीक्षकांना हसू आवरले नाही. पुढील वर्षापासून पुरुषांनाही स्पर्धेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.