आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोलंबो:रानिल विक्रमसिंघे झाले श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

कोलंबो4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आर्थिक संकट आणि निदर्शनांचा सामना करत असलेल्या श्रीलंकेत गुरुवारी विरोधी पक्ष युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे (७३) यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. निदर्शकांच्या मागणीमुळे महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांनी बुधवारी विक्रमसिंघे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. ते आपल्या पक्षाचे एकमेव खासदार आहेत. सत्ताधारी एसएलपीपी, प्रमुख विरोधी पक्ष एसजेबीचा एक गट आणि काही पक्षांनी संसदेत विक्रमसिंघे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते विक्रमसिंघे चार वेळा पंतप्रधान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची प्रतिमा चांगली आहे.

बातम्या आणखी आहेत...