आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान झालेत. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी गुरुवारी त्यांना संयुक्त सरकारचे पंतप्रधान म्हणून पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांनी आतापर्यंत 5 वेळा लंकेचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. 73 वर्षीय रानिल देशाचे सर्वात चांगले राजकीय व्यवस्थापक व अमेरिका समर्थक म्हणून ओळखले जातात.
दुसरीकडे, एका महत्वपूर्ण राजकीय घटनाक्रमांतर्गत माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे व त्यांच्या 8 निकटवर्तीय सहकाऱ्यांना देशाबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सरकारने त्यांचे पासपोर्ट जप्त केल्याचेही वृत्त आहे. महिंदा राष्ट्रपती गोटाबाया यांचे बंधू असून, सध्या त्यांनी एका नौदल तळावर आश्रय घेतला आहे.
कोण आहेत रानिल विक्रमसिंघे
रानिल विक्रमसिंघे 1994 पासून यूनायटेड नॅश्नल पार्टीचे प्रमुख आहेत. त्यांनी आतापर्यंत 4 वेळा श्रीलंकेचे पंतप्रधानपद सांभाळले आहे. 73 वर्षीय रानिल यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे. 70 च्या दशकात त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 1977 मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले. त्यानंतर 1993 मध्ये पंतप्रधान म्हणून देशाची सूत्रे स्विकारण्यापूर्वी त्यांनी उप परराष्ट्र मंत्री, युवा व रोजगार मंत्र्यांसह अनेक मंत्रालयाचा पदभार सांभाळला. यात त्यांनी दोनवेळा संसदेतील विरोधी पक्षनेत्याची भूमिकाही पार पाडली आहे.
श्रीलंकेतील संकटाशी मोठे अपडेट्स...
नवे मंत्रिमंडळही नियुक्त होणार
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी काही दिवसांपूर्वीच नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा करण्याची ग्वाही दिली होती. ते म्हणाले होते -येत्या आठवड्याभरात मी बहुमत व जनतेचा विश्वास असणाऱ्या व्यक्तीची पंतप्रधानपदी नियुक्ती करेल. एवढेच नाही तर नवे मंत्रिमंडळही स्थापन करेल. पण, तोपर्यंत जनतेने हिंसाचारापासून स्वतःला दूर ठेवावे. ---------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.