आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Rare Illness To Eight year old Girl; Major Father Walked 700 Km Barefoot To Raise Money For Treatment

प्रेरणादायी:आठ वर्षांच्या मुलीला दुर्मिळ आजार; उपचारांकरिता पैसे जमवण्यासाठी मेजर पिता 700 किमी अनवाणी चालले

लंडन2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रिसची मुलगी हसतीला सीडीएलएस आजार आहे, 30 हजार मुलांमध्ये एकाला तो होतो

ब्रिटिश लष्करातील मेजर क्रिस बॅननिगन यांचा ७०० किमींचा पायी प्रवास नुकताच पूर्ण झाला. त्यांची ८ वर्षांची मुलगी हसतीच्या उपचाराकरिता पैसे जमवण्यासाठी त्यांनी ३५ दिवसांत अनवाणी हे अंतर कापले. हसतीला दुर्मिळ सीडीएलएस (कॉर्नेलिया डे लँग सिंड्रोम) आहे. यात शारीरिक व मानसिक वाढ खुंटते. वजन कमी होते आणि उंचीही वाढत नाही. जो ३० हजार मुलांमधून एकाला होतो. एडिनबर्ग ते स्कॉटलंडपर्यंतच्या प्रवासात क्रिस यांनी ३ लाख युरो म्हणजे सुमारे २ कोटी रुपये जमवले. मुलीसाठीच्या या संघर्षात क्रिसच्या युनिटचे ३२ जणही पायी चालले. सध्या हसतीवर उपचार सुरू आहेत. जे महागडे आहेत.