आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • 'Rat Epidemic' Declared In The State Of New South Wales, Australia; Rats Biting Sleeping People, Destroying Crops; 5 Thousand Liters Of Poison Sought From India

ऑस्टेलियामध्ये 'माऊस प्लेग' जाहीर:झोपलेल्या लोकांना उंदरांचा चावा, भारतातून आयात केले 5 हजार लीटर विष

न्यू साऊथ वेल्स2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उंदरांकडून पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस

ऑस्ट्रेलियात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया सरकार उंदरांमुळे त्रस्त झाले आहे. उंदरं फक्त शेतातल्या पिकांची नासधूसच करत नसून न्यू साऊथ वेल्समध्ये झोपलेल्या लोकांना चावत आहेत. शिवाय घरातील इलेक्ट्रिक वायर्स कट करत असून त्यामुळे घरामध्ये आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन सरकारने भारताकडून 5000 लिटर ब्रोमेडीओलोन विषाची मागणी केली.

न्यू साउथ वेल्समध्ये उंदरांची वाढती संख्या लक्षात घेता ऑस्ट्रेलियात 'माऊस प्लेग' जाहीर करण्यात आला आहे. कृषीमंत्री अ‍ॅडम मार्शल म्हणाले की, उंदरं शेतात, घरे, छतावर, शाळा आणि रुग्णालयात प्रवेश करत असून तेथील फर्निचरसह इतर साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस करत आहे. उंदरांमुळे लोक आजारी पडत आहेत. शेतातील हातातोंडाशी आलेला घास उंदरं हिरावून घेत असल्याने बहुतेक शेतकरी नाराज आहेत.

बातम्या आणखी आहेत...