आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अबब..उंदीर मांजरीला नव्हे केळीला घाबरतो:अनावधानाने लागला शोध, केळीच्या रासायनिक संयुगामुळे उंदरांत निर्माण होतो तणाव

ओटाव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उंदीर मांजराला घाबरतो हे सर्वश्रूत आहे. पण, एका संशोधनाद्वारे या पूर्वापार चालत आलेल्या समजुतीला छेद बसला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, "उंदीर मांजराला नव्हे तर केळीला घाबरतो." हे ऐकण्यास काहीसे विचित्र वाटत असले तरी शास्त्रज्ञांना अनावधानाने लागलेल्या एका शोधामुळे हे सिद्ध झाले आहे. संशोधक गरोदर व स्तनदा मादा उंदरावरील नर उंदराच्या प्रतिक्रियेचा अभ्यास करत होते. यावेळी त्यांना केळीच्या रासायनिक संयुगामुळे नर उंदरांत तणावपूर्ण प्रतिक्रिया निर्माण होत असल्याचे आढळले.

नर उंदरांत तणाव आला दिसून

"सायंस अ‍ॅ​​​​​​​डव्हान्स" नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात नमूद करण्यात आले आहे की, "नर उंदरांत तणाव दिसून आला." मॉन्ट्रियल मॅगकिल युनिव्हर्सिटीच्या संशोधन पथकाला असे आढळले की, "गरोदर व स्तनदा मादी उंदरांनी अनोळखी नर उंदरांबद्दल आक्रमकता दर्शविली व लघवीच्या चिन्हासह प्रतिसाद दिला. नर उंदीर त्यांच्या आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु, मादी उंदीर त्यांना पळवून लावण्यासाठी व सावध करण्यासाठी रसायने सोडली. त्यानंतर नर उंदराने त्यांच्यापासून अंतर राखले."

गंध घेण्याच्या शक्तीने संकेत समजतात

या संशोधनाचे वरिष्ठ लेखक प्रोफेसर जेफ्री मोगिल यांच्या म्हणण्यानुसार, "उंदीर व इतर अनेक सस्तन प्राणी त्यांच्या गंध घेण्याच्या शक्तीचा वापर करतात. प्राण्यांमध्ये लघवीच्या वासाचा म्हणजे मूत्रगंधाचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अर्थ असतो. पण, या संशोधनात जे आढळले ते वेगळेच आहे. गंध घेण्याचे संकेत सामान्यतः नर एखाद्या मादीला पाठवतो. असे संकेत क्वचितच मादा उंदीर नराला पाठवते. पण, या प्रकरणात मादा उंदीर नर उंदराला दूर राहण्यासाठी असे संकेत पाठवत होती असे संशोधकांचे म्हणणे आहे."

कोठून आली केळीची भीती

संशोधकांना स्तनदा व मादा उंदरांच्या लघवीमध्ये "एन-पेंटाइल एसीटेट" (N-Pentyl Acetate) नामक संयुग आढळले. हे संयुग केळीसह अनेक फळांत आढळणाऱ्या संयुगासारखे आहे. केळीचा अर्क बनवण्यासाठी ते फळांतून काढले जाते. या रसायनामुळे नर उंदरांतील हार्मोनमध्ये बदल होतो. संशोधकांच्या पथकाने उंदरांच्या पिंजऱ्यात केळीचा अर्क टाकला असता त्यांच्यातील तणावात मोठी वाढ झाली. हा तणाव उंदरांच्या लढाईत निर्माण होणाऱ्या तणावाएवढाच होता. यावरुन मादा उंदीर नसली तरी रसायन नर उंदराला भडकावू शकते हे सिद्ध झाले.

बातम्या आणखी आहेत...