आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • RAW Chief Met Prime Minister Oli As Modi's Representative, Discussed China And Indian Map; Revelation Of Nepali Foreign Minister

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-नेपाळ सीमावाद:मोदींचे प्रतिनिधी म्हणून रॉ प्रमुख पंतप्रधान ओलींना भेटले, चीन आणि भारतीय नकाशा यावर झाली चर्चा; नेपाळी परराष्ट्रमंत्र्यांचा खुलासा

काठमांडूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या नोव्हेंबरमध्ये भारताच्या वतीने प्रकाशित केलेल्या नकाशावर नेपाळने तीव्र आक्षेप नोंदवले होते

भारतीय गुप्तहेर संस्था रॉचे प्रमुख सामंत गोयल यांचा नेपाळ दौरा आणि तेथे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांची घेतलेली भेट यावरून वाद पेटलेला असताना नेपाळी परराष्ट्रमंत्री प्रदीप ग्यावली यांनी म्हटले आहे की, गोयल रॉचे प्रमुख या नात्याने नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी म्हणून ओली यांना भेटले होते. दोन तासांच्या चर्चेत चीनशी ताणले गेलेले संबंध आणि नेपाळच्या वादग्रस्त नकाशावर चर्चा झाली. दरम्यान, ग्यावली यांनी काठमांडूत एका रेडिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, “या भेटीदरम्यान ओली यांनी सीमावादावर नेपाळची बाजू भक्कमपणे मांडली. लिपियाधुरा, लिपुलेखबाबत नेपाळ ठाम आहे.’ दरम्यान, पंतप्रधान ओली यांनी रॉचे प्रमुख गोयल यांच्याशी झालेल्या भेटीनंतर नेपाळचा जो नकाशा ट्वीट केला तो पाहता नेपाळ-चीन संबंधांवर भारताचे धोरण प्रभावी ठरत चालले असल्याचे सिद्ध होते.

ग्यावली यांनी म्हटले आहे की, रॉ प्रमुख व ओली यांच्या भेटीत गोपनीय काहीही नव्हते. १५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांची ओलींशी फोनवर चर्चा झाली. नंतर मोदींचे प्रतिनिधी म्हणून गोयल नेपाळमध्ये आले. ग्यावली म्हणाले की, गेल्या नोव्हेंबरमध्ये भारताच्या वतीने प्रकाशित केलेल्या नकाशावर नेपाळने तीव्र आक्षेप नोंदवले होते.