आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Re firing At Kabul Airport; Afghans Attacked With Sharp Weapons And Whips, Women Throw Their Children At Barbed Wire Towards The Airport

तालिबानी दहशत:काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार; अफगाण लोकांवर धारदार शस्त्रे आणि चाबूकाने केला जातोय हल्ला, महिला आपल्या मुलांना काटेरी तारांवरुन विमानतळाच्या दिशेने फेकताहेत

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तालिबानी क्रूरता दाखवणार नाही असा दावा करत होते, मात्र, त्यांचे वास्तवाचे व्हिडिओ समोर येत आहेत. ज्यामध्ये तालिबानी दहशतवादी क्रूरतेने अफगानी लोकांना चाबकाने मारताना दिसताहेत. तसेच अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचलेल्या लोकांवर तालिबानी धारदार शस्त्रांचा वापर करत आहेत. दरम्यान, रात्री काबूल विमानतळावर पुन्हा गोळीबार झाला. मात्र, हा गोळीबार अमेरिकन सैनिकांनी जमावावर नियंत्रण ठेवण्याचा इशारा म्हणून केला असल्याचे सांगितले जात आहे.

अफगाणिस्तान सोडण्यासाठी काबूल विमानतळावर प्रचंड गर्दी
अमेरिका आपल्या लोकांना एअरलिफ्ट करण्यात व्यस्त आहे. त्याचवेळी, अफगाणिस्तानातून हजारो लोक तेथून बाहेर पडण्यासाठी काबूल विमानतळावर पोहोचत आहेत. पण तालिबान त्यांना गेटवर थांबवत आहे.
असेही वृत्त आहे की काही महिला आपल्या मुलांना काटेरी तारांवरुन विमानतळाच्या दिशेने फेकत आहेत. जेणेकरून दुसऱ्या बाजूला असलेले अमेरिकन सैनिक त्यांना पकडू शकतील आणि ते विमानतळाच्या आत पोहचतील. तसेच, अमेरिकेचे म्हणणे आहे की, आतापर्यंत 9 हजार लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले आहे.

कंधारमध्ये अफगाण सेनेचे 4 कमांडरची हत्या
कंधारमधील स्टेडियममध्ये जमावासमोर तालिबानने अफगाण सैन्याच्या 4 कमांडरची हत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 15 ऑगस्ट रोजी घडली. हे कमांडर 13 ऑगस्ट रोजी तालिबानला शरण गेले होते.

बातम्या आणखी आहेत...