आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Reading And Talking Around A Six month old Child Can Make The Child's Academic Development More Rapid After A Few Years

नवे संशोधन:केवळ सहा महिन्यांच्या मुलाच्या आसपास बोलून वाचन केल्यास काही वर्षांनंतर त्या मुलाचा शैक्षणिक विकास होतो अधिक वेगाने

बार्सिलोनाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुलांच्या शैक्षणिक विकासात आई-वडिलांचे योगदान जेव्हा मुले बोलूही शकत नाहीत तेव्हापासून सुरू होते. आई पहिली शिक्षक मानली जाते आणि वडिलांच्या वर्तनाचा परिणाम मुलाचे आचरण ठरवतो. बार्सिलोनात शिक्षणाची थिंक टँक म्हणवल्या जाणाऱ्या बॉफेल फाउंडेशनच्या नव्या संशोधनानुसार, मुलगा बालपणी जितके जास्त शब्द ऐकतो, त्याचा शैक्षणिक विकास तितक्याच वेगाने होतो. माता-पिता आपल्या मुलाजवळ बोलून वाचत असतील तर ते ६ महिन्यांच्या शालेय ज्ञानाइतके असते, असे संशोधनात आढळले.

अशी मुले इतरांच्या तुलनेत लवकर वाचायला शिकतात हेही संशोधनात आढळले. मुलांच्या पालन-पोषणावर झालेल्या इतर एका संशोधनात सांगितले आहे की, श्रीमंत कुटंुबात जन्मलेल्या मुलाने आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील मुलापेक्षा सुमारे ३ कोटी जास्त शब्द ऐकलेले असतात. तथापि, कौटुंबिक वातावरण, परिस्थिती व समाजाच्या दृष्टीने यात बदल होतो. याचा परिणाम तो ९ वर्षांचा होईपर्यंत सकारात्मकरीत्या त्याच्या शौक्षणिक कामगिरीवर होतो. आम धारणेच्या उलट जर माता-पिता आपल्या मुलांचे होमवर्क स्वत: करवून घेत असतील तर ते योग्य नसल्याचेही या संशोधनात आढळले. यामुळे त्याची शिकण्याची क्षमता कमी होते. मुलांनाच त्यांचे होमवर्क करू द्या, पण त्यांची अभ्यास करण्याची विशिष्ट जागा व ठरावीक वेळ असेल तर यामुळे मुलांमध्ये एक प्रकारची सकारात्मकता येते. त्यांच्यात शिस्तही लागते. इक्विटी लिट्रसी इन्स्टिट्यूटचे संस्थापक व डेफिसिट आयडियोलॉजीची टर्म देणारे पॉल गोर्सकी म्हणतात, मुलांच्या विकासाचा वेग मंद असेल तर त्याचे पालक त्याचा सांभाळ चुकीच्या पद्धतीने करत असल्याचे समजावे. माता-पित्याचे वर्तन व त्यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा थेट परिणाम मुलाच्या शैक्षणिक कामगिरीवर होतो.

मुलांच्या शैक्षणिक विकासावरील संशोधनातून हेही कळाले की, ज्यांची भाषा व उच्चार चांगला असतो त्याच विद्यार्थ्यांना शिक्षक पात्र समजतात. इतकेच नाही तर पूर्वाग्रहांमुळे शिक्षक विद्यार्थ्यांचा ग्रेडही कमी करतात.

मुलांना त्यांचे छंद पूर्ण करण्याची संधी अन् वेळ द्या {आई-वडिलांना शिकताना पाहून मुलाची शिकण्याची इच्छा जागृत होते. {मुलांच्या वाचनाची, खेळण्याची वेळ ठरवा. त्यांना शिस्त लागेल. {मुलांची तुलना कोणत्याही परिस्थितीत इतर मुलांसोबत करता कामा नये. {मुलाने चांगली कामगिरी केल्यास त्यांना आपल्या पातळीवर बक्षीस द्या. {मुलांना त्यांचे छंद पूर्ण करण्याची संधी आणि वेळ द्या. {मित्रांना भेटू द्या. जितके मोठे सामाजिक वर्तुळ तितकाच विकास होईल.

बातम्या आणखी आहेत...