आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी शंभर वर्षांचा झालोय, हे फार महत्त्वाचे नाही. मी आजही माझ्या आयुष्याचा आनंद घेतोय, हे महत्त्वाचे आहे. औषधांवर अवलंबून जगत नाही, अंथरुणावर पडून नाही. ३० वर्षांच्या तरुणासारखी अनुभूती घेतोय, हे म्हणणे आहे अमेरिकेच्या पेन्सिल्व्हेनियातील रहिवासी, अमेरिकी वायुदलाचे निवृत्त पायलट लेस सविनो यांचे. ते दुसऱ्या महायुद्धात लढाऊ विमान उडवायचे. त्यांनी आपल्या दीर्घायुष्याचे रहस्य सांगितले आहे. ते सांगतात, नियमित दिनचर्या हे माझ्या दीर्घायुष्याचे कारण आहे. मी सिगारेट ओढत नाही आणि मला आठवत नाही की मी कधी मद्याला हातही लावला होता. मी गेल्या ४० वर्षांपासून एकाच दिनचर्येचे पालन करत आहे. सकाळी ७ वाजता उठतो आणि रात्री १०.३० वाजता झोपतो. आठवड्यातील ५ दिवस सकाळी ३ तास जीमध्ये घाम गाळतो. यातील तीन दिवस वजन उचलतो आणि दोन दिवस कार्डिओ करतो. १५ वेगवेगळ्या वेट मशीनवर ४५ वेळा वजन उचलतो, म्हणजे दररोज जवळपास ७०० वेळा. कॉर्डियोच्या दोन दिवसांत १३ किलोमीटर सायकल चालवतो.
ट्रेडमिलवर ३ किलोमीटर चालतो. हात-पाय आणि खांद्याचाही व्यायाम करतो. औषधे म्हणाल तर फक्त रक्तदाबाची गोळी घेतो. मी खाण्या-पिण्याची खूप काळजी घेतो. हिरव्या भाज्या खातो. मी मांसाहारी आहे आणि सीफूड म्हणजे मासे मला खूप आवडतात. आठवड्यातून एकदा अंड्यापासून बनलेली फ्रिटाटा ही डिश खातो. मी फक्त चवीसाठी जेवण करत नाही. पोट भरताच खाणे बंद करतो. ११ वर्षांपूर्वी ८९ च्या वयात माझ्या पत्नीचे निधन झाले, मात्र मी स्वत:ला एकटा पडू देत नाही. जीममध्ये नवीन मित्र बनवतो. मित्रांसोबत जीवनाचा आनंद वाढतो. पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी मी ८३ व्या वर्षी निवृत्ती घेतली. आता माझ्या आवडीची कथा आणि हेरगिरीवरील पुस्तके वाचतो. वाचनामुळे स्मरणशक्ती वाढते.
ब्रिटनमध्ये जॉन टिनिसवूड हेही आनंदाने जगत आहेत. तेे १०९ वर्षांचे आहेत. ते म्हणतात, आपल्या आवडीचे काम करत राहा, अन्यथा शारिरीक, मानसिकदृष्ट्या आजारी पडाल. भविष्याचा विचार करून तणाव घेणे मी खूप वर्षांपूर्वीच सोडून दिले. तणाव आयुष्यातील अनेक वर्षे कमी करतो.
जास्त कमावणाऱ्यांना मिळते दीर्घायुष्य युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोने ३ वर्षांपर्यंत कॅनडातील ७ हजार लोकांवर संशोधन केले. व्यायाम करणाऱ्या महिला आणि विवाहित तरुण आपल्या वयाच्या अन्य लोकांपेक्षा अधिक निरोगी असतात. जास्त कमावणारे, सिगारेट न ओढणारे आणि जे पूर्ण झोप घेतात ते आपल्यासोबतच्या लोकांच्या तुलनेत जास्त निरोगी आणि दीर्घ आयुष्य जगतात. त्यांची स्मरणशक्तीही इतरांपेक्षा चांगली असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.