आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वर्ष २०२० हे कोरोनाचेच नव्हे तर वादळांचेही वर्ष आहे. अॅटलांटिक महासागरातील थीटा वादळ यंदाचे २९ वे चक्रीवादळ आहे. यामुळे वर्ष २०२० मध्ये अॅटलांटिक हरिकेन हंगामात एका वर्षात नाव दिलेल्या सर्वाधिक वादळांचा विक्रम झाला. आधीचा विक्रम २००५चा होता. एखाद्या ट्रॉपिकल किंवा उष्णकटिबंधीय वादळ ६३ किलोमीटर प्रतितास वेगाने वाहते तेव्हा त्याला एखादे नाव दिले जाते. हवेचा वेग ११९ किमी प्रतितास होतो तेव्हा त्या वादळाला हरिकेन म्हटले जाते.
अखेर असे काय झाले की यंदा एवढ्या तीव्र वेगाची वादळे आली? सर्व शास्त्रज्ञ सांगतात की, याचे मोठे कारण हवामान बदल आहे. मागील एका शतकात जगात ट्रॉपिकल चक्रीवादळांच्या संख्येत स्थिरता राहिली तर अॅटलांटिक बेसिनमध्ये वर्ष १९८० पासून आतापर्यंत नाव दिलेल्या वादळांच्या संख्येत वाढ झाली. वर्ष २०२०मध्ये विक्रमी संख्येत चक्रीवादळ येण्याचा संबंध महासागराच्या तापमानात होत असलेल्या वाढीशी काही शास्त्रज्ञ जोडतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.