आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॅनडा:ब्रिटिश कोलंबिया प्रांतात 121 वर्षांनंतर विक्रमी बर्फवृष्टी; 24 तासांत 16 इंच बर्फ

व्हिक्टोरियाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1899 नंतर ऑक्टोबरमध्ये प्रचंड झाली होती हिमवृष्टी

कॅनडाच्या ब्रिटिश काेलंबिया प्रांतात बुधवारी झालेल्या हंगामातील पहिल्या हिमवृष्टीने १२१ वर्षांच्या विक्रमाला माेडले आहे. येथे चाेवीस तासांत ४१ सेंमी (सुमारे १६ इंच) बर्फवृष्टी झाली. सर्वाधिक बर्फवृष्टी कलाेना सिटी, आेसाेयूस, आेकानगन, व्हाइट स्की रिसाेर्टच्या भागात झाली. येथे तापमान उणे आठ अंश सेल्सियसपर्यंत पाेहाेचले. ब्रिटिश काेलंबियातील हवामान विभागानुसार १८९९ मध्ये ऑक्टाेबरमध्ये ८.४ इंच बर्फवृष्टी झाली हाेती. बुधवार-गुरुवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे आेसाेयूस भागात तीन महामार्ग बंद झाले आहेत. रस्त्यांवर लांबच लांब रांगा लागल्या. काही वाहनांचा अपघातही झाला.