आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:टाइमच्या मुखपृष्ठावर 2020 च्या जागी रेड क्रॉस

वॉशिंग्टनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टाइम मॅग्झिनच्या पर्सन ऑफ द इयरची घोषणा, बायडेन-कमला हॅरिस यांचाही गौरव

जगभरात प्रतिष्ठित नियतकालिकाने डिसेंबर २०२० च्या मुखपृष्ठावर एखाद्या मोठ्या हस्तीच्या छायाचित्राऐवजी २०२० वर रेड क्रॉस ‘एक्स’ असे दर्शवले आहे. त्याखाली वर्स्ट इयर ऑफ द एव्हर - म्हणजेच सार्वकालिक वाईट वर्ष. दुसरीकडे अमेरिकी राजकारणातील परिवर्तनाबद्दल नवनिर्वाचित जो बायडेन व उपाध्यक्ष कमला हॅरिस यांना मॅग्झिनने आपल्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे. दोघांच्या छायाचित्रासह ‘चेंजिंग अमेरिका’ ही स्टोरी आहे. १९२७ पासून टाइम मॅग्झिन पर्सन ऑफ द इयरची निवड करते. यंदा पर्सन ऑफ द इयरच्या शर्यतीत अमेरिकी फिजिशियन डॉक्टर अँथनी फौसी, रेसियल जस्टिस मूव्हमेंट व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पदेखील होेते.

मॅग्झिनने मुखपृष्ठावर रेड क्रॉस लावण्याचा प्रयोग पहिल्यांदा केलेला नाही. ९३ वर्षांचा इतिहास असलेल्या या नियतकालिकात असे करण्याची ही पाचवी वेळ आहे. १९७५ मध्ये पहिल्यांदा जर्मनीचा हुकूमशहा अॅडॉल्फ हिटलरच्या मृत्यूला अशाच प्रकारे मांडण्यात आले होते. इराक युद्धाची सुरुवात झाल्यानंतरदेखील रेड क्रॉसचा प्रयोग झाला होता. तिसऱ्यांदा २००६ मध्ये अमेरिकी सैन्याने इराकमध्ये अल-कायदा दहशतवादी अबू मौसम अल जरकावीची हत्या केल्यानंतर रेड क्रॉसचा वापर केला होता. २०११ मध्ये चौथ्यांदा आेसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यावर रेड क्रॉसचा मुखपृष्ठावर वापर झाला होता. वास्तविक टाइमने गुरुवारी उशिरा रात्री पर्सन ऑफ द इयर, बिझनेस पर्सन ऑफ द इयर एंटरटेनर ऑफ द अयर, अॅथलिट ऑफ द इयर घोषणा केली. त्यात टाइमने बिझनेस पर्सन ऑफ द इयर म्हणून व्हिडिआे चॅट अॅप झूमचे सीईआे एरिक युआन यांची निवड केली. मनोरंजनाच्या क्षेत्रासाठी कोरियन बॉय बँड बीटीएसचा गौरव झाला. अॅथलिट म्हणून लेब्रॉन जेम्सची निवड झाली. १९२७ पासून टाइमने पर्सन ऑफ द इयर निवडण्याची सुरुवात केली. १९९८ मध्ये त्यासाठी पहिल्यांदा ऑनलाइन पोलिंग सुरू झाले.

लोकांबद्दल सहवेदना दाखवण्यात खरी शक्ती
टाइम मॅग्झिनने जो बायडेन व कमला हॅरिस यांची या पुरस्कारासाठी अमेरिकेच्या इतिहासात परिवर्तनाबद्दल राजकीय श्रेणीत निवड केली आहे. टाइमचे मुख्य संपादक एडवर्ड फेल्सेंथल म्हणाले, बायडेन व हॅरिस यांनी अमेरिकेचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला. लोकांमध्ये फूट निर्माण करण्याऐवजी त्यांच्याबद्दल सहवेदना दाखवण्यात जास्त शक्ती असते हेच या द्वयीने दाखवून दिले. दोघांनीही दु:खात बुडालेल्या जगाच्या जखमांवर मलम लावण्याची दृष्टी दिली. अध्यक्षपदावरील व्यक्तीची निवड करण्याची ही टाइमची पहिली वेळ नाही. २०१६ मध्ये ट्रम्प यांची निवड झाली होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser