आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरसची प्रकरणे वाढली आणि प्रवासावरील निर्बंध कडक झाले. डेबोरा गोल्डस्टीन आणि तिच्या ८५ वर्षीय आईला टीव्हीवरील काेराेनाच्या निराशेत आणखी भर घालणाऱ्या आणि राजकीय टीकाटिप्पणी करणाऱ्या बातम्याांपासून दूर जात स्कॉटलंडच्या जंगल प्रवासाला जाणे याेग्य वाटले.तेथे गेल्यावर दाेघींची वन्यजीवप्रेमी किशोरवयीन मुलगी, तिची कजाग सावत्र आई आणि १२ जादुुई कल्पनिक ठेंगूंशी भेट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांनी मॅनहॅटनमधील त्याच्या फ्लॅटमधून या प्रवासाचा आनंद लुटला. वास्तविक डेबोरा ऑनलाइन स्टोरीटेलिंग सर्कलशी (गाेष्टी सांगणारा गट) जाेडलेली आहे.
या गटामध्ये दर दुसऱ्या गुरुवारी, डझनभर लोक ऑनलाइन कथांची देवाण-घेवाण करतात. महामारीमुळेे तणाव आणि एकाकीपणा वाढला आहे. त्यामुळे न्यूयॉर्क सोसायटी फॉर एथिकल कल्चरने यासाठी पुढाकार घेतला. कथा ऐकणे आणि गोष्टींची देवाण-घेवाण केल्याने मानसिक आरोग्य सुधारते. हे चिंता आणि एकाकीपणा कमी करण्यासाठीदेखील प्रभावी आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘एथिकल कल्चर’ गटाशी संबंधित असलेली डेबोराह म्हणते, ‘कथांमुळे माझी चिंता - भीती कमी हाेत आहे.’ डेनेव्हर येथील स्टोरी सेंटरचे प्रमुख डॅनियल वीनशंकर म्हणतात, “आम्ही सर्वजण झूमद्वारे कनेक्ट होतो.” कॅमेरा ऐच्छिक आहे. एका सर्कलमध्ये ५ ते २५ लोक असतात. सहसा हे लोक काल्पनिक कथा आणि कधी कधी वास्तविक अनुभव शेअर करतात. विशेषतः बदलाशी संबंधित. हे लोकांना जीवनातील अनपेक्षित बदलांना सामोरे जाण्यास मदत करू शकते.
अलीकडेच एका नर्सने उडता येत नसलेल्या पक्ष्याची कहाणी सांगितली. तिने त्याचा जीव वाचवला हाेता. तिने सांगितले की, मी माता आणि नवजात मुलांची अशाच प्रकारे काळजी घेत हाेती. पण महामारीने सर्व काही बदलून टाकले. विनशंकर म्हणतात, ‘कोरोनाने लोकांना फक्त दु:ख आणि अनिश्चितता दिली आहे. या मुद्द्यांऐवजी सहभागींनी बालपणीची एखादी गोष्ट किंवा आजी आणि आजीशी संबंधित एखादा किस्सा सांगावा किंवा जीवनातील कसे चढ-उतार येतात आणि त्यांना त्यातून कसे बाहेर काढता येईल हे एखाद्या काल्पनिक व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांना सांगणे असा आमचा प्रयत्न आहे.
गाेष्टी सांगणे आणि ऐकण्यामुळे गंभीर आजारांशी लढण्यातही फायदा : अभ्यास
वीनशंकर म्हणतात की, “कथेचा शेवट आनंददायी असावा यावर आम्ही भर देत नाही. लोकांना प्रामाणिक राहण्यासाठी प्रोत्साहित करतो, जेणेकरून ते वास्तव स्वीकारू शकतील. बऱ्याच अभ्यासांमध्ये स्तनाचा कर्करोग, स्मृतिभ्रंश असलेल्या स्टाेरी टेलिंगद्वारे जीवनात चांगला दर्जा, सामाजिक तणाव कमी करून आणखी चांगली कामगिरी करण्यास मदत झाली. सामाजिक दुरावा कमी करण्यास मदत होते असे दाखवण्यात आले आहे. वीनशंकरांच्या मते कथेपासूनच कथा तयार हाेते. जेव्हा तुम्ही इतरांचे ऐकता किंवा तुमचे म्हणणे मांडता तेव्हा तुम्ही स्वतःला चांगले समजावून घेऊ शकता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.