आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजर्मनीतील दुसरे सर्वात मोठे शहर हॅम्बर्ग येथील येहोवा समुदायाच्या तीन मजली चर्चच्या विटनेस किंगडम हॉलमध्ये गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात ७ जण ठार झाले व आठ जण जखमी झाले. हल्लेखोराने सुमारे १५ राउंड फायर केले आणि नंतर स्वत:वर गोळी झाडली.
शूटिंगदरम्यान चर्चमध्ये सुमारे ५० लोक होते. पोलिस म्हणाले की, पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा चर्चमध्ये अनेक मृतदेह आणि जखमी लोक होते. याचदरम्यान इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर गोळी झाडल्याचा आवाज आला. पोलिस छतावर गेले असता तेथे एक मृतदेह पडलेला होता. फिलिप एफ (३५) असे हल्लेखोराचे नाव असून तो येहोवा समुदायाचा माजी सदस्य होता.
येहोवा समुदाय होता निशाण्यावर हल्लेखोराने येहोवा धार्मिक समुदायाच्या चर्चलाच निशाणा का बनवले, याचा कारणांसह पोलिस शोध घेत आहेत. या छोट्या समुदायाचे जर्मनीत जवळपास १.७५ लाख अनुयायी आहेत. तसेच ९०० समर्पित किंगडम हॉल (चर्च) आहेत. हा शांततावादी गट शस्त्रे उचलण्यास विरोध करतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.