आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेक्सिकोच्या तुरुंगात पर्यटक जाऊ शकणार...:3 वर्षांपूर्वी बंद तुरुंगाचे नूतनीकरण, आता पर्यटन केंद्र

मेक्सिको सिटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेक्सिकोच्या कुख्यात तुरुंगांपैकी एक इस्लास मारियास बेटावरील हा तुरुंग आता पर्यटनस्थळ झाला आहे. या आठवड्यात हा पर्यटकांसाठी उघडला आहे. अनेक दशके जुना हा तुरुंग युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झाला आहे. येथे पर्यटकांना राहण्यासाठी विलासोबत रेस्तराँ, कॅफे आणि सागरी किनाऱ्यासह नेल्सन मंडेला यांच्या नावावरील एक आर्क आहे. मंडेला दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रॉबिन बेटावरील तुरुंगात १८ वर्षे घालवली होती. या तुरुंगात मेक्सिकोचे लेखक जोस रेव्हुएल्टासही कैद होते. या कारागृहाला २०१९ मध्ये बंद केले होते. यानंतर त्याचे नूतनीकरण करून पर्यटनस्थळाच्या रूपात विकसित केले.

१९०५ मध्ये स्थापन, ११४ वर्षांपर्यंत कैद्यांना ठेवले: इस्लास मारियास कारागृह १९०५ मध्ये तयार झाले. २०१९ पर्यंत येथे कैद्यांना ठेवले जात असे. ११४ वर्षे जुन्या या तुरुंगात कैद्यांवर होणारा खर्च कमी करण्यासाठी तुरुंग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...