आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लब्लिन:क्रेन भाड्याने घेऊन ६५ फूट उंचीवरून पाहिली दुचाकी स्पर्धा, स्टेडियमची क्षमता 13 हजार प्रेक्षकांची, पण 25% आसने आरक्षित

लब्लिन3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पर्धा संपल्यानंतर चाहत्यांनी क्रेनच्या लॉबीतूनच आतषबाजी करत आनंद साजरा केला

पोलंडच्या लब्लिन शहरात १३ हजार प्रेक्षकांची क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये दुचाकी स्पर्धा घेण्यात आली. परंतु फिजिकल डिस्टन्सिंग लक्षात घेता, स्टेडियममधील २५ टक्के आसने आरक्षित करण्यात आली. त्यामुळे बहुतांश चाहत्यांना येथे हजर राहता आले नाही. दरम्यान,े त्यांनी स्पर्धा पाहण्यासाठी एक नामी युक्ती शोधली. चाहत्यांच्या एका गटाने १८ क्रेन भाड्याने घेऊन स्टेडियमबाहेर उभी केली. नंतर क्रेनच्या लॉबीत बसून सुमारे ६५ फूट उंचीवरून स्पर्धेचा आनंद घेतला. प्रत्येक क्रेनमध्ये दोन-चार लोक उभे होते. स्पर्धा संपल्यानंतर चाहत्यांनी क्रेनच्या लॉबीतूनच आतषबाजी करत आनंद साजरा केला.