आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Report Says । Chinese Scientists Discussed । Weaponising SARS Coronaviruses । 5 Years Before Pandemic; News And Live Updates

ऑस्ट्रेलियन माध्यमांचा दावा:चीन कोरोना व्हायरसवर 2015 पासून करत आहे संशोधन; याचा जैविक शस्त्र म्हणून करायचे होते वापर

कॅनबराएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

कोरोना व्हायरस 2020 मध्ये अचानकपणे आला नसून चीन त्याची 2015 पासून तयारी करत असल्याचा दावा ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. अवहालानुसार, चीनी सैन्य 6 वर्षांपूर्वी कोविड-19 व्हायरसला जैविक शस्त्र म्हणून वापरण्याचा कट रचत होता. या अहवालात चीनमधील एका शोधनिबंधाचा आधार घेतला असून त्यामध्ये चीन सार्स व्हायरसच्या मदतीने जैविक शस्त्र बनवत असल्याचे नमूद केले आहे.

अहवालानुसार, चिनी शास्त्रज्ञ आणि आरोग्य अधिकारी हे 2015 मध्येच कोरोनाच्या वेगवेगळ्या प्रकारांवर चर्चा करीत होते. त्यावेळी चिनी शास्त्रज्ञांनी या व्हायरसचा तिसर्‍या महायुद्धात जैविक शस्त्र म्हणून वापर केले जाईल असे म्हटले होते. त्यासोबतच त्याला योग्य प्रकारे हाताळत त्या व्हायरसचे महामारीत कसे रुपांतरन करता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली असल्याचे म्हटले आहे.

चीन प्रत्येक वेळी तपासापासून माघार घेतोय
कोरोना व्हायरसच्या तपासणीबाबतचा मुद्दा जेंव्हा समोर येतो तेंव्हा चीन प्रत्येक वेळी माघार घेत असल्याचे अहवालात म्हटले आहे. ऑस्ट्रेलियन सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रॉबर्ट पॉटर यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस कोणत्याही वटवाघुळच्या बाजारातून पसरलेले नाही.

कारण हा सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे. रॉबर्ट यांनी चिनी रिसर्च पेपरवर सखोल अभ्यास केल्यावर म्हटले आहे की, हे संशोधन पेपर एकदम बरोबर असून आम्ही नेहमी चीनच्या रिसर्च पेपरवर अभ्यास करत राहत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...