आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराया वर्षी राजधानी नवी दिल्लीत राजपथावर होणाऱ्या स्वातंत्र्य दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतेह अल-सिसी. कोव्हिड-19 च्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत इजिप्त जवळपास दिवाळखोरीत निघाला आहे. एकूण परदेशी कर्ज 170 अब्ज डॉलर आणि महागाई दर 25 टक्के झाला आहे.
अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहे की जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेल्या भारताने इतक्या महत्वाच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अल सिसींची निवड का केली. भारताला काय हवे आहे? आणि यामुळे त्यांना काय फायदा होईल? इथे आम्ही अशाच काही प्रश्नांची उत्तर देत आहोत.
इतिहासाची गोष्ट आणि देशहित
स्वातंत्र्यानंतरचा इतिहास बघितला तर ही पहिली वेळ असेल जेव्हा इजिप्तचा एखादा नेता स्वातंत्र्य दिन समारंभात प्रमुख पाहूणा म्हणून येत आहे. अरब देशांत तो सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. इस्लामिक देशांच्या संघटनेत इजिप्त दहशतवाद आणि कट्टरतेविरोधातील सर्वात मोठा आवाज आहे. भारत आणि इजिप्तमध्ये राजनयिक संबंध निर्माण होऊनही 75 वर्षे झाली आहेत.
अरब देशांत भारतीयांची लोकसंख्या खूप आहे. इथे इंडियन डायस्पोरा केवळ मजबूतच नाही, तर त्यांचा सन्मानही खूप आहे. सौदी अरेबिया आणि युएईनंतर भारत आता पूर्ण अरब जगतात आपला दबदबा निर्माण करू इच्छित आहे.
सर्व आखाती राष्ट्रे आणि विशेषतः सौदी अरेबिया, युएई आणि बहारीनसोबत भारताचे चांगले संबंध आहेत. त्यांचे इजिप्तशीही चांगले संबंध आहेत. त्यामुळे, भारत आखाती देशांतील सर्वात मोठी सैन्य, आयटी आणि टेक्नो पॉवर बनू इच्छितो. इथेही चीन पाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र अमेरिका आणि युरोपीय देशांची इच्छा आहे की भारताने इथे मोठी भूमिका बजावावी.
इजिप्तचा अडचणीचा काळ आणि विश्वासार्ह मित्र
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.