आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • International
  • Research avoid taking cough syrup in case of corona infection the chemicals in it can increase the number of viruses

नवीन संशोधन :कोरोनाचा संसर्ग झाल्यास कफ सिरप घेणे टाळा, त्यातील केमिकलमुळे व्हायरसची संख्या वाढू शकते

दिव्य मराठीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कॅलिफोर्निया विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या संशोधनात केला दावा

कोरोनाचा संसर्ग आढळल्यास, कफ सिरप घेणे टाळा. यामुळे कोरोनाव्हायरसची संख्या आणखी वाढू शकते असा दावा कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.  संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कफ सिरपमधील डेक्सट्रोमॅथॉर्फन औषध कोरोना प्रतिकृतींची संख्या वाढविण्यात मदतगार ठरू शकते. सिरपमधील डेक्स्ट्रोमेथॉर्फन औषध खोकला थांबवण्यासाठी वापरला जाते. संशोधकांचे म्हणणे आहे की, कोरोनाच्या प्रत्येक प्रकरणांत सिरप घेतल्यास परिस्थिती गंभीर होते किंवा धोका वाढतो, परंतु व्हायरसची संख्या वाढू शकते.

संक्रमित माकडांमध्ये वाढला संसर्ग

संशोधकांनी हिरव्या आफ्रिकन माकडांवर त्याचे संशोधन केले जे ड्रगच्या परिणामाच्या बाबतीत मानवांसारखेच आहे. पॅरिसमधील पॉश्चर संस्थेत संशोधकांची टीम आली. कोरोना संक्रमित माकडाला डेक्सट्रोमथॉर्फन देण्यात आले तेव्हा त्याच्या पेशींमध्ये संक्रमणाचे प्रमाण वाढले. संशोधक प्रो. ब्रायन यांच्यानुसार असे परिणाम आढळ्यानंतर ही माहिती लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक होते.


वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतली जातात अशी औषधे

कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक नेव्हिन क्रोगन म्हणतात की, आपण हे औषध वेगवेगळे केले. जे बहुतेक वेळा वैद्यकीय सल्ल्याशिवाय घेतले जाते. हे औषध संसर्ग वाढीस प्रोत्साहन देते. लोकांना असे औषध घेणे टाळावे. यावर अद्याप संशोधन सुरू आहे. कोरोना संसर्ग होण्यापूर्वी अशा औषधाचा वापर केला पाहिजे की नाही हे अद्याप शोधणे बाकी आहे.


हे औषध मेंदूतून उत्सर्जित होणार्‍या खोकल्याच्या सिग्नलला दडपते

संशोधकांनुसार, सर्दी-खोकलाच्या औषधांमध्ये डेक्सट्रोमथॉर्फनचा वापर केला जातो. हे औषध मेंदूतून उत्सर्जित होणार्या खोकल्याच्या संवदनांना दडपते. सर्दी-खोकल्याच्या बहुतेक औषधांमध्ये त्याचा वापर केल्यामुळे कोरोनाची लक्षणे दिसताच लोक अशा सिरपचा वापर करण्यास सुरवात करतात.


कोरोना औषधाची अद्याप चाचणी सुरू 

मार्चमध्ये 22 संशोधकांच्या पथकाने हे संशोधन केले. संशोधकांच्या मते, अशी अनेक औषधे देखील शोधली गेली आहेत जी व्हायरसची वाढ थांबविण्याचा प्रयत्न करतात. अशा औषधींची संयोजन म्हणून जनावरांवर चाचणी घेतली जात आहे. 

0