आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Research In Quantum Science; Elaine, Jan, Anton's Family, Three Inventors Selected For Second Year In A Row

भाैतिकशास्त्राचे नाेबेल:क्वांटम सायन्समधील संशाेधन; एलेन, जाॅन, अ‍ॅंटन यांचा गाैरव, सलग दुसऱ्या वर्षी तीन संशाेधकांची निवड

स्टाॅकहाेम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राॅयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने यंदा भाैतिकशास्त्रातील याेगदानाबद्दल नाेबेलची घाेषणा केली आहे. यंदा अ‍ॅलेन अ‍ॅस्पेक्ट, जाॅन एफ क्लाॅसर व अ‍ॅंटाेन जिलिंगर यांना संयुक्त रूपाने नाेबेल देण्यात आला. त्यांना क्वाटंम इन्फर्मेशन सायन्स व फाेटाेन्सवर संशाेधनाबद्दल निवडण्यात आले आहे. त्यांचा गाैरव केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील भाैतिकशास्त्रातील संशाेधनाबद्दल तीन संशाेधकांची निवड झाली हाेती. समितीचे सूत्र म्हणाले, या तिघांनी अ‍ॅंटेगल्ड क्वांटम स्टेटस या विषयात अध्ययन केले. त्यात दाेन पार्टिकल्स समान व्यवहार करतात. दाेघांना विलग केल्यानंतरही त्यांचा व्यवहार तसाच असताे. या संशाेधनाचा फायदा केवळ तंत्रज्ञानालाच नव्हे तर फिजिक्सच्या क्वांटम इन्फर्मेशन सिद्धांतालाही हाेईल. यातून गंभीर आजारावरील उपचाराचा मार्ग माेकळा हाेऊ शकताे. या संशाेधनामुळे क्वांटम कॉम्प्युटर्स, क्वांटम नेटवर्क, क्वांटम इन्क्रिप्टेड कम्युनिकेशन या क्षेत्रात क्रांती हाेऊ शकते.

एलेन फ्रान्स , जाॅन अमेरिका, जेलिंगर ऑस्ट्रियाचे एलेन अ‍ॅस्पेक्ट पॅरिसमधील विद्यापीठात प्राेफेसर आहेत. जाॅन एफ क्लाॅसर अमेरिकेतील संशाेधक आहेत. अ‍ॅंटन जेलिंगर ऑस्ट्रियाच्या व्हिएन्ना विद्यापीठात फिजिक्स विभागाचे प्रमुख आहेत.

बातम्या आणखी आहेत...