आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरात पाळीव प्राणी ठेवण्याचा विचार आहे. परंतु त्यामुळे मुलांना अॅलर्जी हाेईल, अशी चिंता वाटत असल्यास तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे. जपानमध्ये ६५ हजार मुलांवर झालेल्या एका अभ्यासानुसार पाळीव प्राणी असलेल्या घरांत गराेदर मातेच्या बाळाला देखील फूड अॅलर्जीची जाेखीम कमी असते. जपानच्या फुकुशिमा मेडिकल युनिव्हर्सिटीच्या बाल चिकित्सा विभागातील हिसाआे आेकाबेच्या नेतृत्वात हा अभ्यास करण्यात आला आहे.
रिसर्च जर्नल पीएलआेएस वनमध्ये प्रकाशित या अहवालानुसार भ्रूण विकास व बालपणादरम्यान मांजरी व श्वानांसाेबत राहणाऱ्या मुलांमध्ये इतर मुलांच्या तुलनेत फूड अॅलर्जीचा धाेका कमी असताे. पाळीव प्राणी नसलेल्या घरात वाढणाऱ्या मुलांच्या तुलनेत पाळीव प्राण्यासाेबत राहणाऱ्या मुलांमधील अॅलर्जीची जाेखीम १३ ते १६ टक्के कमी दिसून आली आहे. संशाेधनानुसार श्वानासाेबत राहिल्याने अंडी, दूध, नट अॅलर्जीचा धाेका घटताे. मांजरी अंडी, गहू व साेयाबिनपासून हाेणाऱ्या फूड अॅलर्जीचा धाेका कमी करतात.
परंतु कासव, पक्ष्यांच्या संपर्कात राहिल्यास मुलांमध्ये नट अॅलर्जीची जाेखीम दुपटीवर दिसून आली आहे. पक्ष्यांचे खाद्य व घुशीसारख्या प्राण्यांच्या पदार्थाशी शारिरिक संपर्क किंवा घरातील धुळीच्या माध्यमातून बालके संवेदनशील हाेऊ शकतात. फूड अॅलर्जीसाठी आईचे वय, कुटुंबातील अॅलर्जीच्या आजाराचा इतिहास, धूम्रपान त्याशिवाय काेणत्या भागात राहताे हे घटकही कारणीभूत असू शकतात. या अभ्यास प्रकल्पाच्या प्रमुख आेकाबे म्हणाल्या, पाळीव प्राणी असलेल्या घरांत प्रत्येक आईला नेहमीच अॅलर्जीची भीती वाटत असते. त्यामुळेच हे संशाेधन पाळीव जनावरांबद्दलची चिंता दूर करण्यासाठी मदत करणारे ठरू शकेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारण : पाळीव प्राणी मायक्राेबायाेमला मजबूत करतात सिनसिनाटी चिल्ड्रन हाॅस्पिटलमध्ये फूड अॅलर्जी प्राेग्रामचे संचालक डाॅ. अमल असद म्हणाले, पाळीव प्राण्यांच्या संपर्कात आल्यावर आई-वडील किंवा घरातील मायक्राेबायाेममध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रुपाने हाेणाऱ्या परिवर्तनातून अर्भकाच्या आंतड्यात मायक्राेबायाेमला बळकट करू शकतात. यातून राेगप्रतिकारक प्रणालीवर परिणाम हाेताे. मायक्राेबायाेम म्हणजे विशिष्ट वातावरण हाेय. त्यात शरीराला फायद्याचे असलेले सूक्ष्मजीव व विषाणू असतात. कमकुवत मायक्राेबायाेममुळे पाेटात राहणारे बॅक्टेरिया आपल्या राेगप्रतिकार प्रणालीवर हल्ला करतात.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.