आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Research On DNA | The Trend Of Underage Girls For Marriage Is Not New; Women Have Been Younger Than Men At Birth For Two And A Half Million Years

डीएनएवर संशोधन:लग्नासाठी कमी वयाच्या मुलीचा कल नवा नाही; अडीच लाख वर्षांपासून मुलांच्या जन्मावेळी पुरुषांपेक्षा तरुण राहिल्या महिला

वॉशिंग्टन8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्नासाठी मुलाच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलीची परंपरा नवीन नाही. जगातील प्रत्येक समाजात हीच परंपरा आहे. शास्त्रज्ञांनी सध्याच्या मानवांच्या डीएनएवर केलेल्या संशोधनात आढळले की स्त्रिया माता झाल्यावर त्यांच्या पतींपेक्षा सरासरीने लहानच असतात. असे शेकडो किंवा हजारो वर्षांपासून नव्हे तर मानवाची उत्पत्ती झाल्याच्या म्हणजे अडीच लाख वर्षांपासून आहे.

या संशोधनात आढळले की, वडील बनलेल्या पुरुषाचे सरासरी वय महिलेपेक्षा ७ वर्षांनी अधिक असते. शास्त्रज्ञांनी सिक्वेन्सिंग तंत्र आणि जेनेटिक डाटाबेसद्वारे डीएनएवर संशोधन केले. हे संशोधन ब्लूमिंग्टनमध्ये इंडियाना विद्यापीठाचे उत्क्रांतीवादी अनुवंशशास्त्रज्ञ रिचर्ड वँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. ते म्हणाले, प्रत्येक मुलाच्या डीएनएमध्ये असलेले म्युटेशन त्यांच्या आईवडिलांच्या डीएनएमध्ये नसतात. याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे गर्भधारणेच्या वेळी डीएनएची क्षती होणे, दुसरे म्हणजे पेशींचे तुकडे होणे. संशोधनात आढळले की, ज्या आईवडिलांचे वय जास्त असते, त्यांच्या डीएनएमध्ये म्युटेशनही अधिक असते. परंतु तरुण आईवडिलांच्या डीएनएमध्ये कमी बदल होतात. वँग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेटावर राहणाऱ्या १५०० लोकांच्या तीन पिढ्यांचे संशोधन केले. त्यांच्या गर्भधारणेच्या वयासह जेनेटिक बदलांची एका सॉफ्टवेअरद्वारे नोंद घेतली. लिंग आणि वयाच्या आधारे झालेले बदलही नोंदवले. यानंतर जगभरातील २५०० आधुनिक लोकांच्या जीनोमवर संशोधन केले. यात आढळले की, मागील अडीच लाख वर्षांपासून मुलांना जन्म देण्याचे सरासरी वय २६.९ वर्षे राहिले. गर्भधारणेच्या वेळी महिला सरासरी २३.२ वर्षांच्या तर पुरुष ३०.७ वर्षांचे आहेत. महिलांचे गर्भधारणेचे सरासरी वय २६.९ राहिले आहे. शास्त्रज्ञांना असेही आढळून आले की, प्रत्येक शतकात हे सरासरी वय एकसारखे नव्हते. प्रत्येक शतक आणि समाजाच्या हिशेबाने ते बदलत राहिले. परंतु एक बाब स्पष्ट आहे की, प्रत्येक शतकात मुलांच्या जन्मावेळी पुरुषाचे वय महिलांपेक्षा अधिकच होते. वँग म्हणाले, पुरुषांत जैविकदृष्ट्या मुलांना जन्म देण्याची क्षमता महिलांपेक्षा अधिक जास्त वेळ टिकून असते.

पितृत्व प्राप्तीवेळी जास्त वय असणे हे सामाजिक कारण डेन्मार्कच्या आर्हस विद्यापीठातील लोकसंख्या अनुवंशशास्त्रज्ञ मायकेल सियेरप म्हणाले, मुलांच्या जन्मावेळी पुरुषांचे वय जास्त असण्यामागे सामाजिक कारणे असू शकतात. पितृसत्ताक समाजात वडील बनण्यापूर्वी समाजात वेगळी ओळख निर्माण करण्याचा दबाव असतो. यासाठी वेळ लागतो. त्यामुळे मुलांचे लग्न उशिरा करण्याची परंपरा बनली. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील लोकसंख्या अनुवंशशास्त्रज्ञ प्रिया मुर्जानींच्या मते जैविकच नव्हे तर पर्यावरणीय कारणांमुळेही पुरुषांचे वय अधिक असते.

बातम्या आणखी आहेत...