आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूयॉर्क:मेक्सिकोच्या संशोधकांनी तयार केला फक्त नाक झाकणारा मास्क

न्यूयॉर्क6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मास्कला 'नाकवाला मास्क' किंवा 'खाण्याचा मास्क' असे नाव दिले आहे.

मेक्सिकोच्या संशोधकांनी असा मास्क बनवला, जो घातल्यावर खाता-पिताना त्रास होत नाही. साेबतच तो कोरोनापासूनही संरक्षण करताे असा दावा करण्यात येत अाहे. त्याला ‘नाकवाला मास्क’ वा ‘खाण्याचा मास्क’ असे नाव दिले अाहे. यामुळे नाक पूर्णपणे झाकले जाते. एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिअाेमध्ये एक महिला व पुरुष हा मास्क खात असल्याचे दाखवले अाहे.

दाेघे पहिल्यांदा साधा मास्क काढतात मग ‘नाकवाला मास्क’ लावून खाणे-पिणे सुरू करतात. जाॅन्स हाफकिन्स युनिव्हर्सिटीच्या मते, मनुष्यांना गंध देण्याची क्षमता प्रदान करणाऱ्या पेशीदेखील कोरोना संक्रमणाचे साधन बनू शकतात. म्हणून नाक झाकून ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे असा संदेश त्यांनी दिला अाहे.

बातम्या आणखी आहेत...