आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणच्या टीटीपीवर हल्ल्याची तयारी:हल्ला केल्यास प्रत्युत्तर देऊ; तालिबानची पाकला धमकी

इस्लामाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तान व अफगाणिस्तानमध्ये आता हल्ल्यावरून तणाव वाढला आहे. पाक सैनिकांची हत्या करणाऱ्या टीटीपी दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात आश्रय मिळथ असल्याचा दावा पाकचे गृहमंत्री राणा सनाउल्ला यांनी केला आहे. त्यामुळेच तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानच्या अफगाणमधील अड्ड्यांवर पाकिस्तान हल्ले करू शकतो. सनाउल्ला यांनी याबाबत केलेल्या वक्तव्यावरून तालिबान भडकले आहे. तालिबानचे संरक्षण मंत्रालयाने सोमवारी आपली भूमिका स्पष्ट करून पाकिस्तानला धमकी देऊन टाकली. कोणत्याही परिस्थितीत हल्ले सहन केले जाणार नाहीत. अफगाणिस्तान नेहमीप्रमाणे आपल्या सार्वभौमत्व व स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी सज्ज आहे.

हल्ले ५१ टक्के वाढले अफगाणिस्तानात तालिबानच्या वर्चस्वानंतर पाकिस्तानात दहशतवादी हल्ले ५१ टक्के वाढले आहेत. डिसेंबर २०२१ च्या तुलनेत गेल्या महिन्यातील दहशतवादी हल्ले ४४ टक्के वाढले. ४९ हल्ल्यांत ३२ जवानांसह ५६ ठार झाले.

बातम्या आणखी आहेत...