आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेल्टा व्हेरिएंटचा परिणाम:युरोपात प्रतिबंध पुन्हा वाढले; पर्यटकांना बंदी, लसीवर भर, फ्रान्स व इटलीत पर्यटकांसाठी व्हॅक्सिन पास आवश्यक

लंडन/ पॅरिस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जर्मनीत नेदरलँड्सच्या प्रवाशांसाठी क्वाॅरंटाइन सक्तीचे

युरोपात कोरोना प्रतिबंध पुन्हा वाढवण्यात आले आहेत. याची दोन प्रमुख कारणे आहेत. पहिले, बहुतांश देशांत डेल्टा व्हेरिएंटचे जास्त रुग्ण आढळणे. दुसरे, ब्रिटन अनलॉक होणे. येथे डेल्टा व्हेरिएंटचे ९९% नवे रुग्ण आहेत. तरीही ब्रिटनचे नागरिक इतर देशांत जात आहेत. म्हणून नेदरलँड्स, बल्गेरियासह अनेक युरोपीय देशांनी ब्रिटिश पर्यटकांना बंदी घातली आहे. मात्र, युरोपातील दक्षिण देशांत मोठ्या प्रमाणात ब्रिटिश पर्यटक येत आहेत. आगामी वीकेंडला युरोपीय देशांमध्ये १ लाख ३५ हजार विदेशी पर्यटक प्रवास करतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. यामुळे कोरोना वेगाने पसरू शकतो. म्हणून युरोपीय देशांनी सीमा नियंत्रण कठोर केले आहे. जर्मनीने नेदरलँड्स व स्पेनच्या प्रवाशांसाठी क्वॉरंटाइन आवश्यक केले आहे. ग्रीस, इटली, फ्रान्स व पोर्तुगाल व्हॅक्सिन पासपोर्ट आणत आहेत. इटली व फ्रान्सने जिम, चित्रपटगृह, संग्रहालयात प्रवेशासाठी लसीकरण प्रमाणपत्र सक्तीचे केले आहे.

अमेरिका : जेथे लसीकरण कमी, तेथे धोका- डॉ. अँथनी फाउची
अमेरिकेचे वरिष्ठ संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. अँथनी फाउची यांनी सांगितले, कोरोना महामारीचा सामना करण्यात अमेरिका चुकीच्या दिशेने जात आहे. जेथे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे तेथे डेल्टा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. देशात पुन्हा मास्क सक्तीबाबत आरोग्य अधिकारी विचार करत आहेत. ज्या लोकांना संसर्गाची जास्त भीती आहे त्यांना बूस्टर डोस देण्याचाही विचार आहे.

युरोप : अर्ध्या लोकांचे लसीकरण पूर्ण, मात्र देशांमध्ये मोठा फरक
युरोपात अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे लसीकरण झाले आहे. मात्र देशांमधील लसीकरणात मोठा फरक आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, रुग्ण वेगाने वाढत असल्याने लसीकरण झालेल्या लोकांसाठीही जोखीम ठरू शकते. फ्रान्समध्ये याच महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रों यांनी लसीकरणाबाबत कठोर इशारा दिला होता. त्यानंतर विक्रमी ३७ लाख लोकांनी लसीसाठी नाेंदणी केली.

युरोपात डेल्टा व्हेरिएंटचे नवे रुग्ण
लंडन स्कूल ऑफ हायजीनमध्ये संसर्गजन्य आजारांचे प्राध्यापक मार्टिन हिबर्ड यांनी सांगितले, नव्या संशोधनानुसार कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत ६०% जास्त वेगाने पसरतो. प्रतिबंध नसल्यास कोरोनाचा मूळ स्ट्रेन १० लोकांकडून २५ लोकांमध्ये पसरतो. तर डेल्टा व्हेरिएंट १० लोकांकडून ७० लोकांमध्ये जाऊ शकतो. यामुळेच आधी ब्रिटन व आता उर्वरित युरोपीय देशांत कोरोना वेगाने पसरत आहे.

बातम्या आणखी आहेत...