आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जा संकट:युरोपात वीज तुटवड्यामुळे डिझेल वाहने पुन्हा सुरू; उत्पादनास फटका

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गॅस, महागड्या विजेमुळे प्रत्येक वस्तूच्या उत्पादनावर दुष्परिणाम

युरोपात ऊर्जेचे संकट गंभीर होत चालले आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक ट्रेन, माल वाहतुकीपासून काचेच्या घरात भाजीपाला उगवण्यापर्यंत सर्व व्यवहारांवर परिणाम दिसून आला आहे. अलीकडेच सरकारने महागडा गॅस व विजेच्या दराकडे लक्ष वेधले. तेव्हा हा विषय माध्यमांतून ऐरणीवर आला. विजेच्या संकटाचा परिणाम केवळ वस्तूंवर नव्हे तर पेपरच्या कागदापासून धातूचे उत्पादन आणि घरांच्या बांधकाम साहित्याच्या दरात झालेल्या वाढीपर्यंत दिसून येत आहे. विजेच्या तुटवड्याचा फटका भारत, चीनला जाणवू लागला आहे. म्हणूनच या देशांत अनेक ठिकाणी ब्लॅकआउट देखील दिसून येते. थंडीचे दिवस लक्षात घेऊन आशियापासून युरोपपर्यंत अतिरिक्त कोळसा उत्खनन व त्याच्या साठवणुकीच्या उपाययोजनेवर काम केले जात आहे. अर्थव्यवस्थेला चालू ठेवण्यासाठी सरकार व उद्योग प्रदूषण पसरवणाऱ्या साधनांचा आधार घेऊन वीज तयार केली जात आहे. युरोपमधील विजेच्य संकटाचा फटका कोणत्या क्षेत्रात जास्त जाणवत आहे, हे जाणून घेऊया.

इलेक्ट्रिक ट्रेनएेवजी डिझेल वाहने : वीज महागडी झाल्याने विजेवरील साधनांवर त्याचा थेट परिणाम झाला आहे. ब्रिटनमध्ये मालवाहू क्षेत्रातील फ्रंटलायनर कंपनीला डिझेलवर चालणाऱ्या वाहनांना पुन्हा रस्त्यावर उतरवावे लागत आहे. उद्याेगातील खर्चात कपात करण्यासाठी कशा प्रकारे इंधनात बदल केला जाऊ शकताे, याचे हे उदाहरण ठरते.

कागदाचा तुटवडा : वृत्तपत्राचा कागद तयार करणारी आघाडीची ब्रिटिश कंपनी पाम पेपर लिमिटेड थंडीत उत्पादनात घट करण्याचा विचार करत आहे. गॅस पुरेशा प्रमाणात खरेदी करू शकत नसल्यामुळे हा निर्णय घेतला जात आहे. कारण विनागॅस प्रकल्प चालवता येऊ शकत नाही. स्वीडिश पेपर मिल किपन्स ब्रुक एबी देखील अडचणीत आहे. कंपनी एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे.

खाद्यान्य संकटाची भीती : गॅस महागडा हाेत असल्याने फर्टिलायझर प्रकल्प दीर्घकाळासाठी बंद हाेऊ शकतात. त्यातून भविष्यात अन्न-धान्याच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. कारण नेदरलँडमध्ये ग्रीनहाऊसमध्ये उष्णता कायम ठेवण्याचे आव्हान असते. खाद्य निर्यातीत वाढ शक्य.

केमिकल उत्पादन लटकले, निर्देशांकाचा उच्चांक
युराेपातील सर्वात माेठ्या केमिकल कंपन्यांपैकी बीएएसएफने अमाेनियाच्या उत्पादनात घट केली आहे. अमाेनियातील कमतरतेमुळे आॅटाेमाेटिव्ह क्षेत्रात देखील समस्या निर्माण हाेऊ शकतात. त्याचा फटका केमिकल उत्पादनाला बसू शकताे. निर्देशांकाचा विक्रमी उच्चांक नोंदवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...