आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Resurgence Of Polio In Several Countries, Including Pakistan; Worried About The Virus Found In America, Britain Too

आरोग्य:पाकिस्तानसह अनेक देशांत पोलिओचे पुनरागमन; अमेरिका, ब्रिटनमध्येही विषाणू आढळल्याने चिंता

अपूर्वा मंडावली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या वर्षाच्या सुरुवातीला जगभरातील आरोग्य तज्ज्ञ खूप उत्साहित होते. मानवाचा शतकानुशतके जुना शत्रू असलेल्या पोलिओचे निर्मूलन अगदी जवळ आहे, असे मानले जात होते. पोलिओचा विषाणू पसरत असलेल्या दोन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होता. वर्षभराहून अधिक काळ तेथे एकही रुग्ण आढळला नाही. अफगाणिस्तानात फक्त चार रुग्ण होते. पण, पोलिओचे भयावह पुनरागमन झाले आहे. फेब्रुवारीमध्ये मलावीमध्ये ३० वर्षांनंतर पहिला रुग्ण आढळला. तीन वर्षांची मुलगी संसर्गामुळे अपंग झाली. हा विषाणू पाकिस्तानातून आल्याचे दिसते. पाकिस्तानमध्येच १४ रुग्ण आढळून आली आहेत. महिनाभरात यातील आठ रुग्ण आढळले आहेत.

मार्चमध्ये इस्रायलने १९८८ नंतरचा पहिला रुग्ण नोंदवला होता. त्यानंतर जूनमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सांडपाण्यात विषाणू आढळल्याचे सांगितले. राष्ट्रीय चिंतेची घटना म्हणून त्याचे वर्णन केले आहे. गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क शहरातील सांडपाण्यात सापडलेल्या विषाणूमुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिओचे उच्चाटन करणे पूर्वीप्रमाणेच अशक्य वाटत आहे. पोलिओमुक्त देश खरोखरच पोलिओच्या धोक्यापासून मुक्त नाहीत, हे यावरून दिसून येते, असे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे पोलिओचे उपसंचालक डॉ. आनंद बंदोपाध्याय म्हणतात. ते म्हणतात, हा विषाणू विमान प्रवाशामार्फत येऊ शकतो.

पोलिओ अत्यंत संसर्गजन्य आहे. तो स्पर्शाने पसरतो. मज्जासंस्थेचा नाश करणारा हा विषाणू घातकही ठरू शकतो. यामुळे काही तासांत अपंगत्व येऊ शकते. विषाणूच्या हल्ल्यातून बरे झालेले लोक अनेक वर्षांनी गंभीर आजारी पडू शकतात. पोलिओ आतड्यात अनेक आठवडे वाढत राहतो. तो विष्ठा वा दूषित अन्न वा पाण्याद्वारे पसरतो. संसर्ग झालेल्या मुलाने शौचालय वापरल्यानंतर हात न धुतल्यास व अन्नपदार्थांना स्पर्श केल्यास संसर्ग संभवतो.

पोलिओपासून संरक्षणाचे दोन मार्ग आहेत. अमेरिका व श्रीमंत देशांत इंजेक्शनद्वारे दिलेल्या लसीत मृत विषाणू असतात. रोगापासून संरक्षणासाठी हे खूप प्रभावी आहे, परंतु ज्या मुलांना लसीकरण केले जाते ते इतरांत विषाणू पसरवू शकतात. तोंडावाटे दिलेल्या लसीत कमकुवत विषाणूचे काही थेंब जिभेवर टाकले जातात. तोंडी लस स्वस्त आहे. सहज देता येईल. लस घेणारी व्यक्ती इतरांना विषाणू पसरवत नाही. पण, यात एक कमतरता आहे. लसीकरण झालेले मूल विष्ठेत एक कमकुवत विषाणू सोडू शकते. यामुळे इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो. कमकुवत झालेला विषाणू बराच काळ सक्रिय राहतो आणि त्याचे स्वरूप बदलते. भारतात अशक्य मानले जात होते पोलिओ निर्मूलन पोलिओ विषाणूचे तीन प्रकार आहेत. २०१५ मध्ये टाइप २ व २०१९ मध्ये टाइप ३ संपल्याचे जाहीर करण्यात आले. फक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये टाइप १ विषाणू सक्रिय आहे. टाइप १ संपण्याची अनेक आशावादी कारणे होती. भारत आणि नायजेरियामध्ये पोलिओ निर्मूलन हे एक अशक्य ध्येय मानले जात होते. पण, दोन्ही देशांनी लक्ष्य गाठले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे पोलिओ निर्मूलन संचालक डॉ. हमीद जाफरी म्हणतात, अनेक लोक आम्हाला सांगायचे की, भारताला कधीही यश मिळणार नाही, पण ते चुकीचे सिद्ध झाले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तानमध्ये लोकसंख्येची नसबंदी करण्यासाठी पाश्चात्त्य देशांकडून लस मिळत असल्याच्या अपप्रचाराने अडथळा आला.

बातम्या आणखी आहेत...