आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना संकटादरम्यान जगभरात लॉकडाऊन होते. तथापि, बऱ्याच ठिकाणी आता लॉकडाऊन शिथिल केले जात आहे. परंतु व्यावसायिकांपासून ते व्यापारी ते विद्यार्थ्यांपर्यंत बहुतांश लोकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ लॉकडाऊनमध्येच गेला आहे. हा काळ विशेषत: त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे, ज्यांनी नुकतीच पदवी पूर्ण केली आहे आणि चांगल्या करिअरची आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत आहेत. अमेरिकेच्या व्हर्जिनियामध्येही असे विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत आणि ते इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच कोरोना संकटानंतरच्या भविष्याविषयी निराश आहेत. अशा परिस्थितीत व्हर्जिनियामध्ये राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनुभवाच्या आधारे ते आयुष्यासाठी त्यांची तयारी करून घेत आहेत.
विद्यार्थ्यांची समस्या, आवडीनुसार शिक्षक निवडले जातात
विद्यार्थ्यांना एक फॉर्म भरावा लागेल, ज्यामध्ये आवडता विषय, प्रश्न व इतर महत्त्वाची माहिती भरावी लागेल. याच्या आधारे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी कोणते शिक्षक चांगले शिक्षक आहेत हे ठरवले जाते. यानंतर फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी व्हिडिओ कॉलवरून मार्गदर्शन केले जाते. गर्दीत जाऊ न जाण्याचा सल्लाही दिला जातो.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.