आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दानिश सिद्दिकींना फोटोग्राफीचा नोबेल:दुसऱ्यांदा मिळाला 'पुलित्झर पुरस्कार', भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारा फोटो ठरला सर्वोत्तम

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकेतील सर्वात मोठा 'पुलित्झर' पुरस्कार 2022 च्या विजेत्यांची सोमवारी उशिरा घोषणा करण्यात आली. त्यात फोटो पत्रकार दानिश सिद्दीकी यांच्या नावाचाही समावेश आहे. यावेळी सिद्दीकीसह त्यांचे सहकारी अदनान अबिदी, सना इर्शाद मट्टू आणि अमित दवे यांना भारतात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचे फोटो काढल्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे. सिद्दीकींचा गेल्या वर्षी अफगाणिस्तानात एका हल्ल्यात मृत्यू झाला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (2021) दानिश सिद्दीकी यांनी काढलेले फोटो....

हे छायाचित्र 4 मे रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीवर क्लिक करण्यात आले होते. यामध्ये कुटुंबातील सदस्य कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत आहेत.
हे छायाचित्र 4 मे रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीवर क्लिक करण्यात आले होते. यामध्ये कुटुंबातील सदस्य कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत आहेत.
हे छायाचित्र 4 मे रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आले होते. यामध्ये 19 वर्षीय प्रणव मिश्रा त्याची आई ममता मिश्रा (45) यांच्या मृतदेहाशेजारी बसला आहे, त्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हे छायाचित्र 4 मे रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आले होते. यामध्ये 19 वर्षीय प्रणव मिश्रा त्याची आई ममता मिश्रा (45) यांच्या मृतदेहाशेजारी बसला आहे, त्याच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हा फोटो 1 मे रोजी नवी दिल्लीतील रुग्णालयात घेण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण दाखवण्यात आले आहेत.
हा फोटो 1 मे रोजी नवी दिल्लीतील रुग्णालयात घेण्यात आला आहे. यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण दाखवण्यात आले आहेत.
हे चित्र 22 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आले होते. यामध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
हे चित्र 22 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आले होते. यामध्ये कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेल्या मृतांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.
हे छायाचित्र 24 एप्रिल रोजी गाझियाबादमधील गुरुद्वाराजवळ घेण्यात आले होते. यामध्ये मनोज कुमार कारमध्ये त्यांची आई विद्या देवी यांच्या शेजारी बसले असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
हे छायाचित्र 24 एप्रिल रोजी गाझियाबादमधील गुरुद्वाराजवळ घेण्यात आले होते. यामध्ये मनोज कुमार कारमध्ये त्यांची आई विद्या देवी यांच्या शेजारी बसले असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.
हा फोटो 28 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आला होता. यामध्ये अभिषेक भारद्वाज आईचा अंत्यसंस्कार केल्यानंतर उभा आहे.
हा फोटो 28 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीत घेण्यात आला होता. यामध्ये अभिषेक भारद्वाज आईचा अंत्यसंस्कार केल्यानंतर उभा आहे.
23 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील गुरु तेग बहादूर रुग्णालयाबाहेर हे छायाचित्र क्लिक करण्यात आले आहे. कोरोनाग्रस्त श्याम नारायण यांना कॅज्युअल्टी वॉर्डबाहेर मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

हा फोटो 24 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीचा आहे. यामध्ये लोक कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.
हा फोटो 24 एप्रिल रोजी नवी दिल्लीतील स्मशानभूमीचा आहे. यामध्ये लोक कोरोनाबाधितांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना दिसत आहेत.
हे छायाचित्र उत्तर प्रदेशातील जेवार जिल्ह्यातील मेवला गोपालगढ गावातील आहे, ज्यामध्ये 65 वर्षीय हरवीर सिंग झाडाखाली खाट टाकून उपचार घेत आहेत.
हे छायाचित्र उत्तर प्रदेशातील जेवार जिल्ह्यातील मेवला गोपालगढ गावातील आहे, ज्यामध्ये 65 वर्षीय हरवीर सिंग झाडाखाली खाट टाकून उपचार घेत आहेत.

अफगाणिस्तानमध्ये गेल्यावर्षी जुलैमध्ये कर्तव्य बजावत असताना ठार झालेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. फिचर फोटोग्राफी विभागामध्ये दानिश यांना यंदाचा ‘पुलित्झर पुरस्कार 2022’ प्रदान केला जाणार आहे. दानिश यांच्यासह आणखी चार भारतीयांना हा बहुमान देण्यात येणार आहे. ‘पुलित्झर पुरस्कार’ हा फोटोग्राफी क्षेत्रात नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. दानिश यांच्या कामाचा या पुरस्काराच्या माध्यमातून मरणोत्तर सन्मान केला जाणार आहे.

सिद्दीकी यांचे अफगाणिस्तानात मृत्यू

गेल्या वर्षी 16 जुलै रोजी अफगाणिस्तानातील कंदहार येथे तालिबान आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय छायाचित्रकार दानिश सिद्दीकींचा मृत्यू झाला होता. अफगाण सैन्याने स्पिन बोल्डकच्या मुख्य बाजारपेठेवर कब्जा करण्यासाठी लढाई सुरू असताना, सिद्दीकी आणि एक वरिष्ठ अफगाण अधिकारी मारले गेले. मात्र, कोणाच्या गोळीबारात सिद्दीकी यांचा मृत्यू झाला याची माहिती नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. सिद्दीकी 38 वर्षांचे होते.

दानिश यांचा हा फोटो अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये घेण्यात आला आहे. 13 जुलै रोजी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. दानिशने लिहिले - 15 तासांच्या मिशननंतर मी 15 मिनिटांचा ब्रेक घेत आहे. (फोटो: रॉयटर्स)

दानिशने आपल्या पत्रकारितेच्या कारकिर्दीला टीव्हीपासून केली होती सुरुवात

दानिश हा मुंबईचा रहिवासी होता. त्यांनी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. 2007 मध्ये त्यांनी मास कम्युनिकेशन रिसर्च सेंटर, जामिया येथून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. त्‍यांनी त्‍यांच्‍या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनमध्‍ये केली आणि 2010 मध्‍ये रॉयटर्स जॉईन केले.

हा फोटो नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या दंगलीचा आहे. यामध्ये जमावाने 37 वर्षीय मोहम्मद जुबेरला घेराव घालून हल्ला केला. (फोटो: रॉयटर्स)
हा फोटो नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निषेधार्थ दिल्लीत झालेल्या दंगलीचा आहे. यामध्ये जमावाने 37 वर्षीय मोहम्मद जुबेरला घेराव घालून हल्ला केला. (फोटो: रॉयटर्स)

पुलित्झरने फोटोसंदर्भात काय म्हटलंय…

दानिश यांच्या रॉयटर्स वृत्तसंस्थेमधील सहकारी अदनान अबिदी, साना इशरद माटो आणि अमित दवे यांनाही या पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. “भारतामधील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारे फोटो हे भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारे असून फोटो पाहणाऱ्याला त्या जागेचे महत्व अखोरेखित करुन सांगणारे आहेत,” असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर म्हटले आहे.

या फोटोला मिळणारा पुरस्कार?

22 एप्रिल 2021 रोजी नवी दिल्लीमधील एका स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी अनेक कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात होते, त्यावेळी दानिश यांनी आपल्या कॅमेऱ्यातून हा फोटो काढला होता. या फोटोमध्ये स्मशानभूमीच्या भिंतींच्या सीमा या लोकवस्तीला लागून असल्याचे स्पष्टपणे दिसते. कोरोनाची दाहकता दर्शवणारा फोटो म्हणून हा फोटो तेव्हा चांगलाच चर्चेत आलेला. रॉयटर्स वृत्तसंस्थेसाठी दानिशने हा फोटो काढला होता. हा फोटो पाहताच अनेक जण कोरोनाच्या परिस्थितीने भावूक झाले होते.

पुलित्झर मिळणारे दानिश पहिले भारतीय

दानिश यांना 2018 मध्येही रोहिंग्या निर्वासितांवरील छायांकनाबाबत पुलित्झर पुरस्कार मिळाले होते. हा पुरस्कार मिळविणारे ते पहिलेच भारतीय होते. दानिश यांचे शिक्षण जामिया मिलिया इस्लामियात येथे झाले. तेथे त्यांचे वडील प्राध्यापक होते. दानिश यांचे वडील प्रा. अख्तर सिद्दिकी आणि आई शाहिदा यांनी मुलाच्या मृत्यूप्रकरणी सध्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात तालिबानविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

दानिश आपल्या टीमसह रोहिंग्या निर्वासितांच्या समस्येवर कठीण परिस्थितीत कव्हरेजवर गेले. यादरम्यान काढलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना पुलित्झर पारितोषिक देण्यात आले. (फोटो: रॉयटर्स)
दानिश आपल्या टीमसह रोहिंग्या निर्वासितांच्या समस्येवर कठीण परिस्थितीत कव्हरेजवर गेले. यादरम्यान काढलेल्या छायाचित्रांसाठी त्यांना पुलित्झर पारितोषिक देण्यात आले. (फोटो: रॉयटर्स)

पत्रकारितेच्या क्षेत्रात दिला जाणारा 'पुलित्झर' प्रतिष्ठित पुरस्कार

पुलित्झर पुरस्कार हा पत्रकारितेच्या क्षेत्रात दिला जाणारा अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार आहे. वृत्तपत्र पत्रकारांना, साहित्य आणि संगीत रचनेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो. यात एकूण 21 श्रेणी आहेत. 112 वर्षांपूर्वी अमेरिकन पत्रकार जोसेफ पुलित्झर यांनी कोलंबिया विद्यापीठाला सुमारे साडेसहा कोटी रुपयांची देणगी दिली होती. पुढे याच पैशातून त्यांच्या नावावर पुलित्झर पुरस्कार सुरू झाला.

बातम्या आणखी आहेत...