आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज जागतिक वन दिन:वनराई घटत असताना वृक्षांच्या तुलनेत चौपट ऑक्सिजन देणाऱ्या शेवाळापासून आता क्रांती शक्य, पर्यावरण तज्ज्ञांचे मत

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवाळ.. ज्याला आपण घाण समजतो त्यापासून खाद्यतेल, औषधे, इंधन आणि पाण्यात विरघळणारे प्लास्टिकही तयार होऊ शकते. जर्मनीच्या टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ म्युनिचमध्ये सिंथेटिक बायोटेक्नॉलॉजीचे प्रमुख डॉ. थॉमस ब्रुक यांच्या मते, शे‌वाळाचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. २१ मार्चला जागतिक वन दिन आणि २२ मार्चला जागतिक जल दिन आहे. पाणी-जंगल यापासून आयुष्य कसे बदलू शकते यावर ब्रुक यांच्याशी ‘दै. भास्कर’चे रितेश शुक्ल यांनी केलेल्या चर्चेचा संपादित भाग...

पृथ्वीचे वय ४५० कोटी वर्षे आहे, तर शेवाळ ३५० कोटी वर्षांपासून आहे. शेवाळही झाडांप्रमाणे प्रकाश संश्लेषणादरम्यान कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडते. तथापि, योग्य व्यवस्थापन केले नाही तर ते धोकादायक आहे. वापराविना सडल्यास ते धोकादायक वायू सोडते.

शे‌वाळाचा उपयोग करणे का आवश्यक आहे?
गेल्या ३० वर्षांत जगात ४३ कोटी एकर जंगल कापले गेले. कोविड व युद्धापेक्षा हवामान बदल जास्त धोकादायक आहे. प्रकाश संश्लेषण ही एकमेव अशी प्रक्रिया आहे, जी वातावरणातील कार्बन डायऑक्साइड शोषून त्याची गती कमी करत आहे. हे काम शेवाळापेक्षा चांगले कोणी करू शकत नाही. पुढील ३० वर्षांत जगाची लोकसंख्या ५०% वाढू शकते. भोजनाची गरज ७०% आणि ऊर्जेचा खप १००% वाढेल. जागतिक तापमान २ अंश वाढू शकते. म्हणजे भोजन आणि ऊर्जेचे पर्याय शोधावे लागतील.

शेवाळाचा उपयोग कशासाठी होऊ शकतो?
भोजन : समुद्री शेवाळ पानांप्रमाणे उगवू शकता. ते तळण्याची-भाजण्याची, मीठ मिसळण्याची गरज नाही. स्वाद चिप्ससारखा क्रंची असतो.
औषधे : शेवाळात ओमेगा ३ व ६ व्यतिरिक्त नैसर्गिक साखर, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि अँटिबायोटिक मुबलक आहे. शेवाळ हे फॅटी अॅसिड, बी-९ फॉलेट, पॉलिसेखरिड्ससारखी औषधे तयार करण्याचा उत्तम स्रोत आहे.
खाद्यतेल : कुठल्याही तेलबियांच्या तुलनेत शे‌‌वाळात प्रतिएकर १४ पट जास्त तेल उत्पादनाची क्षमता आहे. अनेक देश तसे करत आहेत.
जैवइंधन : जैवइंधनच नव्हे, विमानासाठीही जेट फ्यूएल तयार होत आहे.
कार्बन फायबर : शेवाळापासून कार्बन फायबर पोलादापेक्षा जास्त मजबूत असते.
वेस्ट मॅनेजमेंट : घाण पाण्यासोबतच सागरी प्रदूषण स्वच्छ करण्यातही उपयुक्त.
प्लास्टिक : ८ कोटी टन प्लास्टिक समुद्रात रोज टाकले जाते. शेवाळापासून पाण्यात विरघळणारे प्लास्टिक तयार करता येऊ शकते.

शेवाळाला जंगलाचा पर्याय कसे मानू शकता?
शेवाळ ३० ते ७० अंश तापमानात खडकाळ जमिनीवर खताशिवाय उगवू शकते. भारत शेवाळावर फोकस्ड पद्धतीने काम करू शकतो. ते जंगलाच्या तुलनेत १० पट वेगाने वाढते. वनस्पतींच्या तुलनेत ४ पट जास्त ऑक्सिजन देते. वेगाने घटत असलेल्या जंगलांच्या भरपाईसाठी हा एक पर्याय आहे.

बातम्या आणखी आहेत...