आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Reward Of 75 Caror For Reporting Election Fraud; Trump Administration Sends Message To Russia Iran Hackers

राष्ट्राध्यक्ष निवडणुक:निवडणूक घाेटाळ्याची माहिती दिल्यास 75 काेटींचे बक्षीस; ट्रम्प प्रशासन पाठवतेय रशिया-इराणच्या हॅकर्सला संदेश

वाॅशिंग्टन / ज्युलियन इ. बर्न्सएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बाह्य हस्तक्षेप रोखण्यासाठी डाव, रशिया-इराणने उडवली खिल्ली

अमेरिकेतील आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील बाह्य हस्तक्षेप राेखण्यासाठी हॅकर्सची मदत घेण्याचा ट्रम्प प्रशासनाचा प्रयत्न आहे. व्हाइट हाऊस प्रशासनाकडून सध्या रशिया व इराणच्या हॅकर्स व सामान्य लाेकांसाठी माेबाइलवरून यासंबंधी आवाहन करणारा संदेश पाठवला जात आहे. निवडणुकीत गैरप्रकार हाेत असल्याची माहिती देणाऱ्यास सुमारे ७५ काेटी रुपये बक्षीस रूपात दिले जातील, असे ट्रम्प प्रशासनाने जाहीर केले आहे. गेल्या निवडणुकीत रशियाच्या मदतीने मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप झाला, असा आराेप ट्रम्प प्रशासनावर झाला हाेता. अशाच प्रकारचे आराेप यंदाच्या निवडणुकीत पुन्हा केले जाऊ नयेत याची खबरदारी म्हणून सरकारने हे पाऊल उचलले आहे. माेबाइलवरील या संदेशांची रशिया व इराणमध्ये खिल्ली उडवली जात आहे. पुतीन सरकारच्या प्रवक्त्या मारिया जाखाराेवा म्हणाल्या, अमेरिकेचा हा प्रयत्न व्यर्थ जाईल. यामागे रशियन लाेकांना त्रस्त करण्याचा प्रयत्न दिसताे.

हा अस्सल हायब्रीड अॅटॅकसारखा नाही, असा प्रश्न त्यांनी केला. इराणमध्येही सरकारच्या संदेशांची टर उडवण्यात आली. अनेक युजर्सने मेसेजचे स्क्रीन शाॅट साेशल मीडियावर पाेस्ट केले. इराणचे बँकिंग नियम वाॅशिंग्टनमधून बक्षीस म्हणून घेऊ दिले जाणार नाहीत, असे काही युजर्सनी म्हटले आहे. इराण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत हस्तक्षेप करू शकतो? या विचाराने काही युजर्स हैराण आहेत. कारण तसे नसते तर असा संदेश िमळाला नसता.

शीतयुद्धात रेडिआे तर कधी पत्रकांतून अमेरिका धमकी देत
अमेरिकेच्या मीडियात या संदेशांना देशाच्या सीमेबाहेर पाठवण्यासाठी २०२० अमेरिकी व्हर्जन असे संबाेधले जात आहे. पहिल्या शीतयुद्धाच्या काळात रेडिआे-फ्री युराेपच्या माध्यमातून अमेरिकेने कार्यक्रम प्रसारित केले होते. इराणमध्ये रासायनिक शस्त्रास्त्र वापराच्या विराेधात अमेरिका पत्रकबाजी करत. सध्याचे माेबाइल संदेश हे ट्रम्प यांच्या प्रचाराचा भाग आहे, असे सूत्राने म्हटले.

बातम्या आणखी आहेत...